आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर घेतल्याने एटीएम फोडणारा सापडला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दोन महिन्यांपूर्वीच नोकरी गेल्याने पगार नाही. तरीही त्याने नवीन घर खरेदी केले. शिवाय महागडा मोबाइलही विकत घेतला. त्यामुळे तो पोलिसांच्या खबऱ्याच्या डोळ्यात सलू लागला. खबऱ्याने ही माहिती पोलिसांना दिली आणि स्टेट बँक ऑफ हैदराबादचे एटीएम फोडून २३ लाख हजार रुपये चोरल्याच्या घटनेला वाचा फुटली. किरण परप्पा वाघमारे (२६, रा. एकनाथनगर) असे या हायटेक भामट्याचे नाव आहे.

बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या सिक्युरिटी ट्रान्स इंडिया या कंपनीत किरण कामाला होता. त्यामुळे त्याला एटीमएममध्ये पैसे कसे भरायचे याचे ज्ञान होते. मात्र त्याने १७ एप्रिलपूर्वीच नोकरी सोडली होती. १७ जून रोजी पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान तो धूत हॉस्पिटलच्या समोरील एसबीएच बँकेच्या एटीएमवर गेला. तेथील बंद एटीएममध्ये त्याने अंदाजे कोड टाकला आणि तिजोरी उघडली. एटीएममधील २३ लाख हजार रुपये सिमेंटच्या गोणीत भरून त्याने पळ काढला.

या सर्व प्रकरणाचे बँकेला काहीच गांभीर्य नव्हते. प्रथम पोलिसांनी आरोपी पकडला आणि नंतर बँकेला कळवले. त्यानंतर पैसे भरणाऱ्या कंपनीने ऑडिट केले. चार दिवसांपूर्वी कंपनीचे व्यवस्थापक बाळकृष्ण दीक्षित यांच्या फिर्यादीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी किरणला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली

बँक अधिकारी, कर्मचारी गोत्यात येणार
एटीएमचा सध्याचा कोड किरण वाघमारेला कसा माहिती झाला याचा पोलिस शोध घेत आहेत. विशेष म्हणजे एटीएममध्ये पैसे भरताना सिक्युरिटी कंपनीचे व्यवस्थापक आणि बँकेचे अधिकारी यांच्या मोबाइलवर तत्काळ एसएमएस जातो. तो या वेळी आला नव्हता का, १७ जून रोजी चोरी होऊनही बँकेला माहिती कशी कळली नाही, असे प्रश्न उपस्थित होत असून यात बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सिक्युरिटी ट्रान्स कंपनीचे अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता आहे.

असे उडवले पैसे
चोरलेल्या २३.६ लाखांतून त्याने १२ लाखांचे घर घेतले. १० लाख रुपये चुलतभावाच्या बँक खात्यावर जमा केले, तर दोन लाख रुपये खर्च केले. यातूनच महागडा मोबाइल खरेदी केला. तसेच सूतगिरणी चौकात चहा- नाष्ट्याचे हॉटेलही टाकले. पोलिसांनी त्याच्याकडून आठ लाख रुपये परत मिळवले आहेत.