आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ATM Receipt News In Marathi, Loksabha, Reserve Bank

‘दिव्य मराठी’चे वृत्त लोकसभेत, एटीएम पावतीमुळे कॅन्सर; RBIला संशोधनाचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एटीएमच्या पावतीमुळे कॅन्सर होण्याचा धोका असल्याच्या ‘दिव्य मराठी’च्या बातमीची दखल लोकसभेत घेण्यात आली. जबलपूरचे खासदार राकेश सिंग यांनी शून्य प्रहरात हा विशेष मुद्दा उपस्थित केला, तेव्हा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रिझर्व्ह बँकेला संशोधन करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ‘दिव्य मराठी’सह भास्कर समूहाच्या सर्व आवृत्त्यांत 22 जून रोजी ‘एटीएमच्या पावतीमुळे होतो कॅन्सर’ हे वृत्त प्रसिद्ध होताच देशभर खळबळ उडाली. नंतर इलेक्ट्रॉनिक मीडियानेही हा विषय लावून धरला आणि दिल्लीतील प्रयोगशाळेत पुन्हा थर्मल पेपरच्या पावतीची चाचणी घेण्यात आली. दैनिक भास्करच्या जबलपूर आवृत्तीतील बातमीवरून खासदार राकेश सिंग यांनी 18 जुलै रोजी यासंबंधी लोकसभेत प्रश्न उपस्थित केले.
अर्थमंत्र्यांच्या आदेशानंतर रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांच्या चेअरमनला पत्र पाठवले आहे. बँकेने कागद पुरवठा करणार्‍या कंपन्यांकडून अहवाल मागवला आहे.

आरोग्यमंत्र्यांकडे जाणार
जनतेच्या आरोग्याशी निगडित हा मुद्दा आरोग्यमंत्री हर्षवर्धनांकडे लावून धरू. कागद वापरावर बंदीचा कायदा आणण्यासाठी प्रयत्न करू.
- राकेश सिंग, खासदार, जबलपूर

हे विचारले प्रश्न... : एटीएमच्या पावतीत आरोग्यास हानिकारक रसायने आहेत काय? हे खरे असेल, तर त्याची सविस्तर माहिती सभागृहास द्यावी.
० सरकार याबाबतीत कोणती पावले उचलणार? त्यावर बँकांच्या एटीएमचा कागद कसा आहे याबाबत संशोधन करून अहवाल द्यावा, अशा सूचना रिझर्व्ह बँकेला देण्यात आल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.