आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ATM Recipt News In Marathi, Cancer, Divya Marathi, Health

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एटीएमच्या पावतीमुळे होतो कॅन्सर!, बसचे नवे तिकीटही मानवी शरीराला घातक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एटीएममधून येणारी पावती हाताळताना आपण कॅन्सरसारख्या रोगाला निमंत्रण देतो, हे बहुतेकांना माहिती नसले तरी ते सत्य ‘दिव्य मराठी’ ने घेतलेल्या पुढाकारामुळे समोर आले आहे. परिवहन महामंडळाचे हजारो वाहक आणि लाखो प्रवासीही याच धोक्याच्या सावटातच रोज वावरताहेत. एटीएममधून येणारी पावती, पेट्रोल पंपावर मिळणारी पावती, एसटीचं तिकीट, ऑनलाइन लॉटरीची तिकिटे, शॉपिंग मॉल आणि सुपर शॉपीमध्ये मिळणा-या बिलवजा पावत्या ज्या गुळगुळीत कागदावर प्रिंट होतात त्या कागदातच कॅन्सरची बीजं दडलेली असतात. केवळ कॅन्सरच नव्हे तर वंध्यत्व, मेंदू आणि मज्जारज्जूचे आजार आणि असे अनेक गंभीर आजारही या कागदाच्या संपर्कातून होतात. ‘दिव्य मराठी’ने घेतलेल्या पुढाकाराने या कागदाच्या रासायनिक विश्लेषणानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान विभागप्रमुखांनी हा धोका स्पष्ट केला आहे.

ही बिले, पावत्या आणि तिकिटे देण्यासाठी ज्या यंत्राचा वापर केला जातो त्याला थर्मल प्रिंटर आणि त्यासाठीच्या कागदाला औष्णिक संवेदी कागद (थर्मल सेन्सिटिव्ह पेपर) म्हणतात. हा कागद वजनाने हलका आणि कमी खर्चिक असल्याने त्याचा वापर झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळेच ‘दिव्य मराठी’ ने अशी बिले व पावत्यांच्या कागदाची चाचणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान विभागाच्या प्रयोगशाळेतून करून घेतली. या कागदाच्या कोटिंगमध्ये मानवी शरीरावर घातक दुष्परिणाम करणारी रसायने वापरण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

काय आहे बीपीए?
बीपीए म्हणजे बायस्फेनॉल. हे एक औद्योगिक रसायन असून काही प्लास्टिक आणि रेझीन उत्पादनासाठी 1960 पासून वापरले जात आहे. पॉलिकार्बोनेट प्लास्टिक आणि इपोक्सी रेझीनमध्ये ते मोठ्या प्रमाणात आढळते. अन्नाच्या हवाबंद कॅन, पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनचे आतील आवरण, बाटल्यांच्या आतील थर आणि पेयांमध्ये त्याचा वापर केला जातो.

अशी जातात शरीरात घातक रसायने
हा कागद पाच सेकंद कोरड्या हातात राहिल्यास साधारणत: 1 मायक्रोग्राम बीपीए बोटांना लागते.
हात ओलसर असेल तर दहापटीने जास्त बीपीए त्वचेवाटे शरीरात जाते.
जी व्यक्ती दिवसाकाठी सतत दहा तास हा कागद हाताळते त्याच्या शरीरात 71 मायक्रोग्राम बीपीए प्रवेश करतो.
हे प्रमाण सुसह्य दैनिक सेवनाच्या (टॉलरेबल डेली इनटेक) 42 पटींनी अधिक आहे.

राज्यात
18000 बसगाड्या असून दररोज सव्वा लाख फे-या होतात.
या एकाच आगारासाठी महिन्याला 4000 ते 5000 रोल लागतात.
तिकीटांसाठी राज्य परिवहन महामंडळाला
पुरवण्यात येणा-या थर्मल पेपर रोलचे कंत्राट प्रायमॅक्स कंपनीला देण्यात आले आहे.

औरंगाबाद आगारात
550 बसेस आहेत. त्यांच्या दररोज 1500 फे-या होतात.

वारंवार संपर्क घातक
शाईचा वापर न करता पावती किंवा बिले देण्यासाठी थर्मल प्रिंटरमध्ये वापरल्या जाणा-या थर्मल पेपर कोटिंगवर बायस्फेनॉल ए (बीपीए)चा वापर केला जात आहे. या पावत्या अथवा बिलांच्या वारंवार संपर्कात येणा-या व्यक्तीच्या शरीरात त्वचेवाटे बीपीए शरीरात जाते आणि सामान्य पातळीपेक्षा बीपीएची पातळी वाढून त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात.
- डॉ. प्रवीण वक्ते, विभागप्रमुख, रसायन तंत्रज्ञान विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

या घातक रसायनांचा वापर औष्णिक संवेदी कागदाच्या कोटिंगमध्ये ट्रायरील मिथेन थॉलिड किंवा फ्लोओरन हे ल्युको डाय, बायस्फेनॉल ए (बीपीए) आणि बायस्फेनॉल बी (बीपीएस) , झिंक साल्ट हे डेव्हलपर, इथेन, बेन्झिलोक्सिनाथिलेन हे सेन्सिटायजर्स आणि स्टॅबिलायजर्स

या आजारांना आमंत्रण
स्तन आणि पौरुषग्रंथीचा कर्करोग, शुक्राणूंच्या प्रमाणात घट, पुरुषांचा मूत्रमार्ग आणि प्रजननेंद्रियाची असामान्य वाढ, महिलांमध्ये अकाली लैंगिक प्रौढत्व, मेंदू आणि मज्जासंस्थेच्या समस्यांमध्ये वाढ, अकाली स्थूलपणात वाढ, मधुमेहाची लागण आणि रोगप्रतिकारक क्षमतेमध्ये घट.

गर्भवती, स्तनदा मातांच्या बाळांना धोका
बीपीए रसायनांचा गर्भवती आणि स्तनदा मातांपासून बाळांना धोका होण्याची शक्यता असते. या रसायनामुळे मेंदूचा विकास आणि अंतस्त्रावी ग्रंथीवर विपरीत परिणाम होतो.
या देशात पेपर वापरण्यास बंदी.. कॅलिफोर्निया, फ्रान्स, डेन्मार्क, स्वीडन, मेरीलँड, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, वेरमाउंट, कॅनडा, मॅसॅच्युसेट्स, मिनीसोटा.