आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यरात्री चोरट्यांनी एटीएम फोडले; रक्कम सुरक्षित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गारखेडा येथील सूतगिरणी रोडवरील अथर्व प्लाझामध्ये असणाारे एसबीआय बँकेचे एटीम चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री २.३० ते वाजेच्या सुमारास फोडले. मात्र, रक्कम काढता आल्याने चोरट्यांनी पळ काढला. याची माहिती एका सुरक्षा रक्षकाने मुकुंदवाडी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

गुरुवारी मध्यरात्री २.३० ते वाजेच्या सुमारास सूतगिरणी रोडवरील एसबीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातील रक्कम काढण्यात यश आले नाही. हा प्रकार बाजूला असलेल्या अथर्व प्लाझाच्या सुरक्षा रक्षकाने पाहिल्यानंतर त्याने मुकुंदवाडी पोलिस स्टेशनला फोन केला. पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके हे पथकासह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आसपास चोरट्यांचा शोध घेतला, मात्र चोरटे पळून गेले. या प्रकरणी एटीएममध्ये पैसे भरणा करणारे कंपनीचे कर्मचारी राजेश दवणे यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली.

रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी उचलले
याप्रकरणी रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. तसेच एका एटीएम फोडी प्रकरणातील गांधेली येथील आरोपी दीपक बर्डे, सिराज यांचा पोलिसांनी शोध घेतला. मात्र, हे दोघे आता जालना येथे काम करत आहेत. दरम्यान, चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा, तसेच केबल तोडून टाकले. पोलिसांनी तज्ज्ञांना बोलावून चोरट्यांचे चेहरे दिसतात का याचा शोध सुरू केला आहे.