आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीतील एटीएम असुरक्षित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज-वाळूज महानगरातील बहुतांश एटीएम असुरक्षित असून तिथे सुरक्षा रक्षक तैनात नाहीत. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना ग्राहकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. औरंगाबाद शहरात 9 नोव्हेंबर 2013 रोजी स्टेट बँकेच्या एटीएमचा पासवर्ड माहीत
करून घेऊन 16 लाख 17 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली होती. त्याचाच प्रत्यय वाळूज परिसरातील असुरक्षित एटीएम पाहून येतो. वाळूज, पंढरपूर आणि बजाजनगर परिसरात विविध बँकांचे 23 एटीएम सेंटर आहेत. मंगळवारी (10 जून) रात्री बहुतांश एटीएमची पाहणी केली असता केवळ 3 एटीएमवर सुरक्षा रक्षक आढळून आले. त्यातील दोन सुरक्षा रक्षक झोपले होते. त्यामुळे सुरक्षा रक्षक असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.
संख्येत वाढ : झपाट्याने वाढणा-या वाळूज औद्योगिक परिसरात अनेक बँकांच्या शाखा सुरू झाल्या. एटीएमची सुविधा उपलब्ध क रून दिली गेली. त्यामुळे एकट्या पंढरपूर व बजाजनगरमध्ये तब्बल 19 तर वाळूजमध्ये 4 एटीएम सुरू करण्यात आले.
सुरक्षा रक्षकच नाहीत : बहुतांश एटीएमवर सुरक्षा रक्षक नसल्याचे आढळून आले. केवळ तीन ठिकाणीच सुरक्षा रक्षक दिसून आले. त्यातही एक जण झोपेत होता.

नावापुरतेच दरवाजे : सुरक्षिततेचा भाग म्हणून दरवाजा बाहेरील बाजूने उघडण्यापूर्वी कार्ड स्वॅप के ल्यानंतर दार उघडते. आत प्रवेश करताच दरवाजा ऑटोमॅटिक लॉक होतो. मात्र परिसरातील एकाही एटीएम सेंटरवर ही सुविधा सुरू नाही.
एटीएम फोडण्याचे प्रकार : परिसरातील तिरंगा चौक व मोरे चौकालगतचे एटीएम फोडून पैसे पळवण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून झाला आहे. सुदैवाने त्यात त्यांना यश आले नाही. ज्या एटीएम फोडून पैसे पळवण्याचा प्रयत्न केला होता, त्या ठिकाणी अद्यापही सुरक्षा रक्षक नसल्याचे पाहणीवरून समोर आले आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे : अनेक एटीएममध्ये एकच सीसीटीव्ही कॅमेरा आढळून आला. त्याच्या गुणवत्ता व कार्यक्षमतेविषयी बँक प्रशासनाकडेही पुरेशी माहिती उपलब्ध नाही.
अंधारात एटीएम सेंटर : अनेक एटीएम परिसरात अंधार असल्यामुळे परिसरातील हालचाली रस्त्यावरील नागरिकांच्या सहजपणे लक्षात येत नाहीत.

सूचना केल्या आहेत

अनेक बँकांचे एटीएम शाखेच्याच परिसरात आहेत. सुरक्षिततेबाबत आम्ही प्रत्येकाला सूचना केलेल्या आहेत. त्याचे त्यांनी पालन करावे.
इंदलसिंग बहुरे, पोलिस निरीक्षक, वाळूज एमआयडीसी