आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालिकेवर अत्याचार करणारा फरार अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत बकवालनगर परिसरात आरोपी रमेश ऊर्फ डॅनियल मोरे (४४) या नराधमाने तीनवर्षीय चिमुरडीचा विनयभंग केल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी घडली होती. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला. अखेर वाळूज पोलिसांनी मोठ्या शिताफीने या नराधमाला अटक केली.
घटनेच्या दिवशी १३ ऑक्टोबर रोजी, मुलीचे वडील घरात झोपल्यामुळे तीनवर्षीय मुलगी अंगणात खेळत होती. आरोपी रमेशने तिला आमिष दाखवून घरात बोलावून घेत तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केल्यामुळे मुलीने रडायला सुरुवात केली. घटनेची माहिती मुलीकडून तिच्या पालकांना कळताच अारोपीने त्यांनाच शिवीगाळ केली. मुलीचे पालक पोलिसांत गेल्याची माहिती मिळताच आरोपी फरार झाला. आरोपीलाही दोन मुली व मोठा मुलगा आहे. मुलगा १२ वी, तर मुलगी १० वी आणि सातवीच्या वर्गात शिक्षण घेतात.

आरोपी जेरबंद
महिनाभरापासून फरार आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथील नातलगाच्या घरी लपून बसल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक कदम यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा देगलूरकर, डीबी पथक प्रमुख धर्मेंद्र गायकवाड, सुधीर सोनवणे, संगीता राजपूत आदींच्या पथकाने प्रवरानगर येथून आरोपीला शनिवारी ताब्यात घेतले. आरोपीला रविवारी गंगापूर न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास फौजदार सुवर्णा देगलूरकर करत आहेत.