आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३५० वेबसाइट्स ब्लॉक, इसिसशी संपर्काचा संशय; अटकेतील तरुणांचे विदेशी म्होरक्याशी चॅटिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशातील तरुणांना दहशतवादी मार्गावर नेणाऱ्या सुमारे ३५० वेबसाइट एटीएसने ब्लॉक केल्या आहेत. इसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून जुलै-ऑगस्टमध्ये परभणी, हिंगोलीतून चार तरुणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या लॅपटॉप, संगणकाची कसून तपासणी केल्यावर या वेबसाइट्स निदर्शनास आल्या होत्या. चारही तरुणांनी घातपाती कारवायांसाठी ज्याच्याशी संपर्क साधला होता त्याचा आयपी अॅड्रेस विदेशातील असल्याचे समोर आले असून नांदेड जिल्हा न्यायालयात १४ ऑक्टोबर रोजी सादर केलेल्या दोषारोपपत्रात ते नमूद करण्यात आल्याची माहिती एटीएसच्या उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
देशभरातून इसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून एटीएस आणि एनआयकडून अटक करण्यात आलेले हे तरुण सोशल नेटवर्किंग आणि वेबसाइटच्या माध्यमातून संवाद साधत होते. सप्टेंबरअखेरीस ३५० वेबसाइट ब्लॉक करण्यात आल्या आहेत. परभणी उर्वरित पान. १०
येथून अटक करण्यात आलेले नासेर चाऊस, शाहिद खान, इकबाल अहेमद कबीर अहेमद आणि हिंगोलीतील शिक्षक मोहम्मद रईसोद्दीन सिद्धिकी

ठ हे सिरियातील फारुक नावाच्या व्यक्तीसोबत इंटरनेटच्या माध्यमातून संपर्कात होते. बॉम्ब कसा तयार करायचा याचे प्रशिक्षण त्यांना फारुकने दिले असून तो इसिसच्या संपर्कात असल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. शाहिद खान याच्याकडून स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. तर इकबालच्या घरातून उर्दू भाषेतील कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यात इसिसचा प्रमुख अबू बकर बगदादी आमचा प्रमुख असल्याचे म्हटले आहे.

१०० तरुणांचे मनपरिवर्तन
इसिस आणि इतर दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या १०० तरुणांचे गेल्या काही महिन्यात मनपरिवर्तन करण्यात आले आहे. काही तरुणांना तर विमानतळावरून परत आणण्यात आले. यात नाशिक, नागपूर, हैदराबाद, अकोला शहरातील तरुणांचा सहभाग होता.

नातेवाईकांना साक्ष ठेवून तपास
परभणी, हिंगोलीतून अटक केलेल्यांचे जवाब नोंदवताना त्यांच्या नातेवाईकांना संपूर्ण कल्पना देण्यात आली होती. सन २०१२ मध्ये औरंगाबादेतील रोजाबाग येथे झालेल्या एनकाऊंटरचा बदला घेण्याचा कट अाखला असून त्यासाठी पोलिस अधिक्षक कार्यालयाची रेकी करण्यात आली असल्याची माहिती मिळाली होती. त्या दिशेनेही सखोल तपास करण्यात आला आहे. १४ जुलै २०१६ रोजी नासेरला परभणीतून अटक झाली होती आणि १४ ऑक्टोबर रोजी दोषारोपपत्र दाखल केले याचे समाधान असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...