आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीत एकावर जणांचा चाकूहल्ला; जखमी व्यक्तीने दुपारी मारहाण केल्याचा हल्लेखोरांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागासमोर एका टोळक्याने जुन्या वादातून ४० वर्षीय व्यक्तीवर चाकूने वार केले. यात ती व्यक्ती गंभीर जखमी झाली. दरम्यान, या वेळी कामानिमित्त आलेले वाळूज पोलिस ठाण्यातील निरीक्षक देशमुख यांनी तत्काळ मारेकऱ्यांना पकडल्याने मोठा अनर्थ टळला. बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अब्दुल गफार खान (४०, रा. कटकट गेट) असे जखमी व्यक्तीचे नाव असून मारहाण करणाऱ्या मुख्तार खान (३२, रा. टाइम्स कॉलनी) याला पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कटकट गेट परिसरातील बाबर कॉलनीमध्ये मन्नान खान (रा. टाइम्स कॉलनी) याचा पेट्रोल पंप आहे. तेथे अब्दुल गफार खान हा व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. परंतु पेट्रोल पंप मालकाशी वाद झाल्याने अब्दुल गफार खानला कामावरून काढून टाकले. याचा मनात राग धरून बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अब्दुल गफार खानने पेट्रोल पंपावर जाऊन मन्नान यांना मारहाण केली. यात मन्नान जखमी झाला, तर अब्दुल गफ्फार खानसोबत गेलेला त्याचा मेहुणा आझमखानही जखमी झाला. दोघांनाही घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वॉर्ड क्रमांक १८ मध्ये उपचार घेत असलेल्या मन्नानला पाहण्यासाठी त्याचा भाऊ मुख्तार खान हा घाटीत गेला होता. त्याच वेळी अब्दुल गफार खानही मेहुणा आझम खानला भेटण्यासाठी गेला होता. दोघेही अपघात विभागाच्या प्रवेशद्वारासमोर समोरासमोर आले. 

मुख्तारसह त्याच्या साथीदारांनी अब्दुल गफार खानवर चाकूहल्ला केला. यात गफार जखमी झाला. तेथे कामानिमित्त आलेले वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक देशमुख इतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत मुख्तार खान इतरांना पकडून बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

पोलिसांना रोख बक्षीस 
हल्लेखोरअब्दुल गफार खानवर हल्ला करण्यासाठी धावून जात असताना पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, शेख मतीन शेख चाँद आणि ए. डी. पठाण यांनी जिवाची पर्वा करता हल्लेखोर मुक्तारला अटकाव करत त्याच्याकडील चाकू जप्त केला. या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी देशमुख त्यांच्या सहकाऱ्यांना १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. 
बातम्या आणखी आहेत...