आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅड. घाणेकरांविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅड. नीलेश घाणेकरांविराेधात त्यांच्याच हाताखाली काम करणार्‍या एका महिला वकिलाने बुधवारी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात लैंगिक शोषणाची तक्रार दिली असून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप त्यांना अटक झाली नसून याप्रकरणी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उत्तम मुंडे यांनी दिली.

बलात्काराची तक्रार दाखल झाल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून सखोल चौकशी करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्वसामान्य माणसाविरुद्ध एखादी तक्रार आली, तर पोलिस त्याला उचलून नेतात. मात्र, या प्रकरणात अ‍ॅड. घाणेकर असल्यामुळे त्यांना पोलिस झुकते माप तर देत नाही ना, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

बलात्काराचे प्रकरण जुने आहे. वकिलावर आरोप असल्यामुळे याप्रकरणी सर्व सत्यता पोलिसांना तपासून तसेच पुरावे गोळा करूनच पुढील कारवाई करावी लागेल, असे मत एका विधिज्ञाने व्यक्त केले.

गोळीबार प्रकरणात ना धागे, ना दोरे
माझ्याकारवर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला, अशी तक्रार अ‍ॅड. घाणेकर यांनी सातारा पोलिस ठाण्यात दिली आहे. मात्र, या प्रकरणात अजून कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. तपास सुरू आहे, अशी माहिती सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी दिली.