आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदोबस्त एका ठिकाणी हल्ला दुसऱ्या ठिकाणी, आमदार अतुल सावेंच्या कार्यालयाची तोडफोड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार सावे यांच्या बजरंग चौक येथील कार्यालयाची तोडफोड केली. - Divya Marathi
आमदार सावे यांच्या बजरंग चौक येथील कार्यालयाची तोडफोड केली.
औरंगाबाद - भाजप आमदार अतुल सावे यांच्या सिडकोमधील कार्यालयाची पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. हल्ल्याची अगाऊ माहिती मिळाल्यामुळे सावेंच्या औरंगपूरा येथील कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते. मात्र पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी सावेंच्या मतदारसंघातील कार्यालयाला लक्ष्य करुन पोलिसांना चकवा दिला.   
 
काय आहे प्रकरण 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रमाला आंबेडकरवादी संघटनांनी विरोध केला होता. विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात कार्यक्रम सुरु असताना कार्यक्रमाला विरोध करत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली होती. यावेळी अभाविप आणि आंबेडकरवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती. 
- पँथर सेनेचा आरोप आहे की विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना आमदार सावे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे गजानन सानप, भाजयुमो कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि विद्यापीठाच्या साहित्याची मोडतोड केली.
- लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या विरोधाला भाजपने ठोकशाहीने प्रतिकार केल्याचा आरोप करत पँथर सेनेने त्यांच्या या कृत्याचा निषेध केला. हा हल्ला सुनियोजित असल्याचाही त्यांचा आरोप आहे.
- आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना  झालेल्या मारहाणीमागे आमदार अतुल सावे यांची चिथावणी असल्याचेही कार्यकर्ते म्हणाले.
- सावे यांच्या सिडको मधील बजरंग चौक येथील कार्यालयाची गुरुवारी दुपारी तोडफोड करण्यात आली आहे. कार्यालयाबाहेरील फलकाची पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोडतोड केली. 
 
कोणी केला हल्ला 
- पँथर सेनेचे प्रमुख दिपक केदार यांच्या नेतृत्वात आमदार सावे यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. 
- केदार यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की पँथर सेनेने अतुल सावे यांचे कार्यालय फोडले. याची जबाबदारी आम्ही घेतो. 
- केदार हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्या बरोबरच पोलिसांना सरेंडर होत असल्याचेही पोस्टमध्ये म्हटले आहे. 
- केदार यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे आत्मसमर्पण करणार आहेत. 
- सचिन तिवारी, राहुल घेवंदे, किरण तुपे, विशाल नवगिरे यांनी हा हल्ला केल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, एका कार्यालयाबाहेर बंदोबस्ता हल्ला दुसऱ्या ठिकाणी... 
बातम्या आणखी आहेत...