आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेंडा काढण्यावरून तणाव, जंजाळांचे कार्यालय फोडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गारखेडा परिसरातील शिवाजीनगर येथील मैदानावरील झेंडा काढल्याने संतप्त जमावाने नगरसेवक तथा मनपाचे मावळते सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांच्या संपर्क कार्यालयावर दगडफेक केली. मंगळवारी दुपारी घडलेल्या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगरात तणावाचे वातावरण होते. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी घटनास्थळाची पाहणी करून शांततेचे आवाहन केल्यानंतर रात्री उशिरा तणाव निवळला. तथापि, शीघ्र कृती दलासह पोलिसांचा मोठा फौजफाटा या परिसरात तैनात करण्यात आला आहे.
जंजाळ यांचा वॉर्ड असलेल्या शिवाजीनगरात महानगरपालिकेतर्फे मैदान विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी जंजाळ यांनी पुढाकार घेतला. मंगळवारी मैदानाचे काम सुरू असताना एका खांबावर लावलेले झेंडे काढून घेण्यात आले. सायंकाळी मैदानावर काही तरुण जमले. काढलेला झेंडा त्यांनी पुन्हा मैदानात लावला आणि सायंकाळी सातच्या सुमारास जंजाळ यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. यात कार्यालयाच्या दरवाजाच्या काचा फुटल्या.
कार्यालयावर दगडफेक झाल्याचे कळताच जंजाळ तेथे पोहोचले. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते घटनास्थळी जमले. अभिजित देशमुख यांच्यासह इतर पक्षांचे कार्यकर्तेही तेथे जमले. पाहता पाहता कार्यालयासमोर मोठी गर्दी जमून तणाव निर्माण झाला.

पोलिसांचा फौजफाटा : याघटनेची माहिती कळताच मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर मराठा मोर्चानंतरचे हे पडसाद आहेत. माझ्या विरोधात नाराजी असल्यास मी असताना माझ्या कार्यालयावर हल्ला करा. मीदेखील शिवसैनिक आहे. उत्तराला उत्तर देऊ शकतो. मात्र शहर शांत ठेवण्याची आमच्यावर जबाबदारी आहे. म्हणून आम्ही घोषणाही दिल्या नाहीत. माझ्याविरोधात षड््यंत्र आखले जात आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्यास मोठे आंदोलन उभे राहील. उद्याच्या महापौर निवडणुकीचा या घटनेशी काहीही संबंध नाही. - राजेंद्र जंजाळ, नगरसेवक,शिवाजीनगर

आयुक्तांची यशस्वी मध्यस्थी
जवाहरनगर ठाण्यात अमित भुईगळ इतर नेते जमले होते. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी जमावाशी संवाद साधून यशस्वी मध्यस्थी केल्याने प्रकरण निवळले.

संघाच्या शाखेवरूनही झाला होता वाद
काही महिन्यांपूर्वी याच मैदानावरून नगरसेवक जंजाळ आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. या ठिकाणी संघाची शाखा लावू नका, असे जंजाळ यांचे म्हणणे होते. या वेळी काही समाजकंटकांनी संघ प्रचारकाला मारहाण केली होती. या घटनेनंतर या मैदानाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते.


बातम्या आणखी आहेत...