आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतर विरोधातील मेळाव्यात शिवसेना नेत्यांवर कठोर हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समांतर खासगीकरण योजना नफा तत्त्वावर चालू आहे, हाच सर्वात मोठा घोटाळा असून भगव्या झेंड्याखाली उभे राहत २५ वर्षे नागरिकांना वेठीस धरून समांतराचे पाप केले आहे, अशा शब्दांत समांतर पाणीपुरवठा खासगीकरणविरोधी नागरी कृती समितीचे प्रा. विजय दिवाण यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला. गुरुवारी (२० जून) होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत “समांतर’चा करार रद्द झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला.

भानुदास चव्हाण सभागृहात मंगळवारी (२८ जून) कृती समितीच्या वतीने खासगीकरणविराेधी निर्धार मेळावा घेण्यात आला. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अॅड. मळावेकर, प्रदीप पुरंदरे, रमेशभाई खंडागळे, अण्णा खंदारे, अनंत आचार्य आदींची उपस्थिती होती.
प्रा. दिवाण म्हणाले, समांतर ही फसवी योजना असून काम सुरू झाल्यापासून २० कोटी खर्चून तीन किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. १२९० किलोमीटरची पाइपलाइन ३६ पाण्याच्या टाक्या वाढवल्यामुळे ३६९ कोटींची योजना ७०० कोटींवर पोहोचली. तसेच पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के वाढ होतही आहे. याविरोधात अनेक सभा, जनहित याचिका दाखल झाल्या असून मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, तत्कालीन मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर, संतोषकुमार कमिटी या तिघांनीही कंपनीचे कंत्राट योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. आजही कमी दाबाने दूषित पाणी पुरवले जात अाहे. भगव्या झेंड्याखाली उभे राहत लबाड नेत्यांनी समांतर आणून सामान्यांना वेठीस धरले आहे, असा आरोपही त्यांनी केला. मनपा अभियंता पाणीपुरवठा करण्यास सक्षम नसतील तर त्यांनी राजीनामे द्यावेत, असेही ते म्हणाले.
जनहित याचिकेबाबत विजय सिरसाठ म्हणाले, न्यायालयाच्या दणक्यामुळे मनपाला सभा घ्यावी लागत आहे. योजना सुरू होण्यापूर्वी मनपा प्रशासनाने अनेक बाबी नगरसेवकांच्या लक्षात आणून दिल्या नाहीत. २० वर्षे चालू शकणाऱ्या जायकवाडीच्या जलवाहिनीवर बुस्टर योजना राबवली असती तर समांतर योजना आणण्याची गरज नव्हती. पाण्यावर अजूनही राज्य शासनाचा अधिकार आहे. तो केंद्राकडे गेल्यानंतर काही करता येणार नाही. समांतर योजनेच्या परिणामांकडे लक्ष दिले गेले पाहिजे, असे मत प्रदीप पुरंदरे यांनी नोंदवले. सर्वसाधारण सभेच्या वेळी हातात झेंडे घेऊन निषेध करावा, सभेत करार रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन होईल, असे प्रभाकर चौधरी यांनी सांगितले. अण्णा खंदारे यांनीही समांतरकडून लूट होत असल्याचे सांगत आंदोलन उभारणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
कंपनीकडे जबाबदारी सोपवण्यास विरोध
आमचाकंत्राटदाराकडून काम करून घेण्यास नव्हे तर २० वर्षे एका कंपनीकडे जबाबदारी सोपवण्यास विरोध आहे. पाणी हा जगण्याच्या हक्कातील एक भाग असल्यामुळे जलवितरण ना नफा ना तोटा या तत्त्वावर करायला हवे. परंतु खासगी कंपनीचे नफ्यावर लक्ष आहे. समांतर योजनेतील गौडबंगाल उघड झाल्याने नगरसेवकांनीही योजना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा. मात्र, ३० जून रोजी कंपनीचा ठेका रद्द झाल्यास तीव्र आंदोलने सुरू होतील, असा इशारा त्यांनी दिला.
आयुक्तांना हटवण्यातच रस : अॅड.मळावेकर म्हणाले, शहरात वीज, कचरा, सफाई असे अनेक प्रश्न असताना आयुक्तांना कसे हटवावे यातच त्यांना रस आहे. अनेक निर्णय 'मातोश्री’वर घेतले जातात. मग पदाधिकारी तेवढे सक्षम नाहीत का, हा प्रश्न समोर येतो. त्यातच समांतर योजना मानगुटीवर बसली आहे. ती रद्द व्हावी यासाठी आंदोलन करावे लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...