आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेना आघाडीच्या कार्यकर्तीवर हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादः शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तिकीट मिळाल्यामुळे संतापून नेत्यांवर आरोप केल्यानंतर गुरुवारी महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक ज्योती काथार यांच्यावर घरात घुसून एका महिलेने हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल तिकीट मिळाल्याने नाराज झालेल्या शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना भेटून आपला संताप व्यक्त केला होता. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास ज्योती काथार यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी सुंदर सुपारे या महिलेने महिलेने काथार यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या सासूबाई नणंद यांनी महिलेला बाहेर काढले, पण तिने जाता जाता चप्पल फेकून मारली शिवीगाळ केली.

या प्रकाराची माहिती समजताच महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुनीता आऊलवार, अनिता मंत्री प्रतिभा जगताप यांनी काथार यांच्या घरी धाव घेतली. आऊलवार यांनी हा प्रकार गंभीर असून पक्षाचे काम करूनही घरांवर हल्ले होत असतील तर आम्ही काय करावे, असा सवाल केला. दरम्यान, खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, या प्रकाराशी माझा काहीही संबंध नाही. महिला आघाडीत फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे.
फोटोः मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताना ज्योती काथार.