आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणविरोधी पथकावर हल्ला झाल्यानंतर मोहीम तीव्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- वसमत येथील अतिक्रमण हटाव पथकावर पाच दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यानंतर तहसीलदार तथा प्रभारी नगर परिषद सीओ उमाकांत पारधी यांनी अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र केली असून आतापर्यंत सुमारे ३०० अतिक्रमणे हटविण्यात आली आहे.  

तहसीलदार तथा प्रभारी नगर परिषद सीओ उमाकांत पारधी यांनी गेल्या १० दिवसांपासून वसमत नगर परिषद हद्दीत अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्वच भागांतील अतिक्रमणावर हातोडा हाणला जात आहे. जिल्हा परिषद मैदान ते पंचायत समिती कार्यालयादरम्यान अतिक्रमण हटवत असताना १० जुलै रोजी शेख हबीब, मोहंमद मोबीन, मो. इरफान, बाबुभाई बूटवाले आणि शकील गराजवाला यांनी ‘इस बार तहसीलदार को नहीं छोडना’ असे म्हणून तहसीलदार पारधी यांच्यावर दगडफेक केली होती. याबाबत ५० ते ७५ जणांवर गुन्हे दाखल झाल्यावर या प्रकरणातील एक आरोपी मो. 

इरफान यानेही वसमत पोलिसांत तक्रार केली. तहसीलदार पारधी यांनी अतिक्रमण हटवत असताना न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला आणि आमचे लाखो रुपयांचे नुकसान केले असल्याचे तक्रारीत नमूद करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु या तक्रारीनंतर किंवा जमावाने केलेल्या हल्ल्यानंतर तहसीलदार पारधी यांनी मोहीम न थांबवता किंवा सौम्य न करता अधिक तीव्र केली आहे. रविवारी सुटीनंतर सोमवारी नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बहिर्जी महाविद्यालय, पूर्णा कारखाना रस्ता या भागातील कच्चे, पक्के बांधकाम पाडून टाकले आहे. वसमत येथील अतिक्रम हटाव मोहिमेमुळे रस्ते मोकळे झाले  आहेत. अतिक्रमणमुक्त झाल्याशिवाय मोहीम चालूच राहणार आहे.
बातम्या आणखी आहेत...