आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न, पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या डोक्यात दगड टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीविरुद्ध पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गणेशनगर (पिंपळवाडी पि.) येथे गुरुवारी रात्रीच्या घडली. मीना सुखदेव गजभिव (४०) या घरात झोपलेल्या होत्या. दरम्यान, रात्री तीन वाजेच्या सुमारास पती सुखदेवने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी मीनाला बेदम मारहाण केली. दरम्यान, डोक्यात दगड मारल्याने ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बातम्या आणखी आहेत...