आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; मद्यधुंद युवकाला जमावाचा चोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कटकट गेट येथील सातवर्षीय बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या मद्यधुंद युवकाला नागरिकांनी बुधवारी रात्री साडेआठ वाजता बेदम चोप दिला. बेशुद्ध झालेल्या युवकाला पोलिसांनी घाटीत दाखल केले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

बालिका किराडपुरा परिसरात खेळत होती. त्या वेळी युवकाने तिला चिप्सचे पाकीट देत कटकट गेटपर्यंत सोबत आणले. त्यानंतर तिला गेट परिसरातील नाल्याजवळ अंधारात खाली उतरवले. अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असताना बालिकेने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी नाल्याच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर बालिकेची युवकाच्या तावडीतून सुटका करत नागरिकांनी युवकाला बेदम चोप दिला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. बेशुद्ध युवकाला घाटीत दाखल केले आहे. रात्री उशिरापर्यंत त्याची ओळख पटू शकली नाही. तसेच या घटनेची नोंदही पोलिस ठाण्यात करण्यात आली नसल्याचे पोलिस निरीक्षक गफूर पाटील यांनी सांगितले.