आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल्डर कासलीवालांच्या मालमत्तेचा अखेर लिलाव, थकीत कर्ज प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बिल्डर संजय कासलीवाल यांच्या सातारा परिसरातील एमआयटी महाविद्यालयाजवळील कासलीवाल मार्व्हल आणि कासलीवाल एम्पायर प्रकल्पातील घरांचा लिलाव करण्यात आला. बुधवारी सकाळी साडेदहा ते साडेचारच्या दरम्यान ही प्रक्रिया पार पडली. बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या साडेदहा कोटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. 
 
या वेळी पहिली व दुसरी बोली लावण्यात आली. अंतिम बोली न्यायालयासमोर लावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन्ही गृहप्रकल्पांतील ७४ रो हाऊस, दोन बंगले आणि २४ टि्वन बंगलो यांचा लिलाव होणार आहे. बुधवारी यातील फक्त ७४ रो हाऊसेसच्या लिलावाची बोली लावली गेली. साधारणपणे एका रो हाऊसवर ४० ते ४५ लाखांपर्यंत बोली लागल्याचे सूत्रांनी सांगितले. उर्वरित मालमत्तेचा लिलाव न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार होणार आहे. या वेळी न्यायालयाचे अधिकारी, कर्मचारी वकिलांची उपस्थिती होती. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेकडूनही कासलीवाल यांची चौकशी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.