आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवतांडव अन् बुद्धवंदना; युवा कलावंत अमृता गोगटे यांचा विलोभनीय पदविन्यास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देवतांची स्तुती आणि पौराणिक प्रसंगासह शिवतांडव आणि बृद्धवंदना प्रस्तुत करताना विलोभनीय नृत्याविष्कारला रसिकांनी दाद दिली. शुक्रवारी (6 डिसेंबर) महागामीच्या औरा नृत्योत्सवात पुण्याच्या युवा कलावंत अमृता गोगटे यांचा ‘गतभाव’ आणि ‘ताल रुद्र’ या पदविन्यासाने रसिकांना मोहिनी घातली.
नृत्य जनजागृती बरोबरच पर्यटकांना कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा यासाठी महागामी आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘औरा’ औरंगाबाद या 3 महिन्यांच्या नृत्योत्सवाला सुरुवात झाली असून त्यांची दुसरी शृंखला शुक्रवारी प्रस्तुत करण्यात आली. कथ्थक परंपरेप्रमाणे ‘शिवस्तुतीने’ प्रस्तुतीला सुरुवात करीत अमृता आणि शीतल लालव्हे नृत्यांगनांनी असाधारण नृत्याविष्कार पुढील तासाभरात आपल्यासमोर अवतरणार असल्याचे रसिकांना सांगितले. हिंदोल राग आणि चौतालातील ही रचना ‘शंकर महादेव’ या बोलांमध्ये बांधण्यात आली होती. पारंपरिक धृपदमध्ये शिवस्तुतीत समुद्र मंथन, मदन दाह हे प्रसंग सादर केले. यानंतर अमृताने ‘ताल रुद्र’ या 11 ताल असलेली प्रस्तुती सादर केली. अमृताने प्रस्तुत केलेला ‘गतभाव’ कथ्थक नृत्यप्रकार वेधक ठरला. अमृताने ‘जटायूमोक्ष’चा प्रसंगात सीतेची रावणापासून सुटका करताना जटायू कशा पद्धतीने जखमी झाला हा प्रसंग रसिकांसाठी रोमांचक ठरला.