आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Auragabad Pandharpur Special Railway On 17, 20 July

पंढरपूरसाठी औरंगाबादहून 17, 20 जुलैला विशेष रेल्वेगाडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यातील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीसाठी औरंगाबाद -पंढरपूर (07501) ही विशेष रेल्वेगाडी 17 आणि 20 जुलै रोजी सायंकाळी 8.30 वाजता सोडण्यात येणार आहे.

दहा डब्यांच्या या गाडीला आठ साधारण, दोन लगेज ब्रेक व्हॅन आहेत. बारा तासांच्या प्रवासानंतर ही गाडी दुसर्‍या दिवशी सकाळी 8.30 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. पंढरपूर येथून 18 व 21 जुलै रोजी रात्री 10 वाजता ती परतीच्या प्रवासाला निघणार आहे. ही गाडी जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उस्मानाबाद, बार्शी, कुडरुवाडी आदी स्थानकांवर थांबेल. गाडीचे सर्व डबे विनाआरक्षित आहेत.