आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: हर्सूल तलावातील गाळात रुतून कामगाराचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद:  हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा गाळात फसून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी दहा वाजता घडली. अविनाश बबन कराळे (२१, रा. राधास्वामी कॉलनी, हर्सूल ) असे मृताचे नाव आहे. हर्सूल पोलिस अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आणि घाटीत नेला असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अविनाश कंपनीमध्ये कामगार होता. 
 
शनिवारी तो कंपनीतील मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. त्याच्या मित्राला पोहता येत नसल्याने तो काठावरच थांबला. परंतु अविनाश तलावात उतरला. एकदा बाहेर येऊन साबण लावून तो पुन्हा पाण्यात उतरला आणि गाळात फसला. या प्रकरणाचा तपास शेख रब्बानी करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...