आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीत भ्रष्टाचार; शिवना ग्रामपंचायत कारभाराच्या चौकशीच्या मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
शिवना (औरंगाबाद) - येथील ग्रामपंचायतीने शासनाच्या चौदाव्या वित्त आयोग निधीसह पाणी
पुरवठा वाढीव पाईपलाईन आणि इतर योजनेतून प्राप्त झालेल्या निधीत भ्रष्टाचार केल्याचे आरोप होत आहेत. सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील ग्रामपंचायत प्रशासनाने लाखोंचा मलिदा लाटल्याचे आरोप करत ग्रामपंचायत सदस्यांनी लेखी निवेदन दिले. यात ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
निवेदनात म्हटले आहे, की संत धोंडिबा महाराज मंदिर ते जाधववाडी वसाहत पर्यंतच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत प्राप्त निधीत एकूण रकमेचा निम्मा भाग खर्च करून काम उरकण्यात आले. तसेच चौदाव्या वित्त आयोगाचा ग्रामपंचायत विस्तारीकरण व फर्निचर खरेदीसाठी आलेला निधीच्या रकमेतही अपहार करण्यात आला. जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ या कार्यकाळात फेरफार मासिक बैठकीत एकूण १५५ प्रकरने मंजूर झाली आहेत. त्यासाठी ११०० रुपये एवढ्या फी प्रमाणे १ लाख ७० हजार ५०० रुपये एवढा कर जमा होणे अपेक्षित होते. मात्र, कराच्या रकमेचा हा आकडा केवळ ५८,९०० रुपये इतका दाखवण्यात आला. निवेदनात उर्वरित रकमेचा हिशेब द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...