आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या महापौरांनी जन्मदिनी घेतले घृष्णेश्वराचे दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरुळ : औरंगाबाद शहराचे महापौर भगवान ( बापू ) घडामोड़े यांनी दि. 25 मे रोजी 54 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांनी जन्मदिनानिमित्त सहकुटुंब गुरुवारी सकाळी वेरुळ येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेवास अभिषेक करुण दर्शन घेतले. जगदगुरु  स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे दर्शन घेत आज जन्मदिन असून भावी वाटचाली करिता आपण शुभाशिर्वाद द्यावेत तसेच आपण आगामी काळात औरंगाबाद शहराचे रस्ते सुधारण्यावर प्राधान्याने भर दिला असल्याचे सांगितले. यावेळी स्वामी शांतिगिरीजी महाराजांनी महापौराना शुभाशीर्वाद देताना सांगितले की आपल्या पाठीशी आमचा आशीर्वाद सदैवच असून आपन नेहमी जनतेच्या, साधुसंताच्या, आईवडिलांच्या सेवेत रहावे , जनतेची तक्रार येवू देवू नये , तसेच सर्वाना धरून चालावे तसेच जनतेच्या प्रमुख मागण्या ध्यानात घेवून विकास कामावर भर द्यावा मग याचे उचीत फळ आपणास नक्कीच प्राप्त होईल असे सांगितले तर यावेळी महापौरानी दैनिक दिव्यमराठीशी बोलताना सांगितले की आपण आपला जन्मदिवस साध्या पद्धतीने साजरा करीत असून यामुळे आपण प्रामुख्याने पोष्टर , होर्डिंग बाजीस टाळले असून जन्मदिनानिमित्त रुग्णांची तसेच अनाथांची सेवा म्हणून हेडगेवार, घाटी रुग्णालय सह विविध अनाथ , वृद्धाश्रमामध्ये भोजनाचे आयोजन करण्यात आले असून आपणही आज त्यांच्यासोबतच भोजन घेणार आहे. घृष्णेश्वर विकास आराखडा शिखर समिती समोर असून लवकरच या आराखड़यालाही मंजूर मिळावी म्हणून मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वने व वित्तमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करणार आहोत असे सांगितले. व्यवस्थापक बाळासाहेब गवळी , रामानंदजी गोस्के , घृष्णेश्वर देवस्थान अध्यक्ष दीपक शुक्ला , माजी अध्यक्ष संजय वैद्य , माजी कार्यकारी विश्वस्त योगेश टोपरे , व्यापारी आघाडी तालुकाद्यक्ष गणेश हजारी , सागर मातकर , प्रभु थोरात यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 
 
 
बातम्या आणखी आहेत...