आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या जुन्या शहराचा पाणीपुरवठा आज विस्कळीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० व्यासाच्या जुन्या वाहिनीचा व्हॉल्व्ह गुरुवारी सकाळी रेल्वे उड्डाणपुलाजवळ निखळून लाखो लिटर पाणी वाया गेले. पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र यासाठी सात तासांचा अवधी लागल्याने शुक्रवारी (१६ जून) जुन्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. भरपावसात कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. कामाला विलंब लागणार असल्याने सात तास वाहिनीतून पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपासून हा व्हॉल्व्ह निखळलेला होता. त्यातून जास्त पाणी जात नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आता ऐन रमजानमध्ये नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. शुक्रवारी काही भागात उशिराने तर काही भागात कमी दाबाने पाणी येईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. 
 
बातम्या आणखी आहेत...