आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई जनशताब्दीचा पल्ला घटला; अडचणी वाढल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सतत मेगाब्लॉकचे कारण पुढे करत जनशताब्दी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) पर्यंत न नेता दादरलाच थांबवली जात आहे. या गाडीचा दादर हा शेवटचा थांबा असल्यामुळे मंत्रालयात काम घेऊन जाणार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 1 ऑक्टोबरपासून प्रवाशांना 15 कि.मी. अलीकडे दादरला उतरावे लागत असल्याने टॅक्सीचा चारशे रुपयांचा अतिरिक्त भुर्दंडही सोसावा लागत आहे.

सीएसटीपर्यंत रेल्वेगाडी पोहोचत नसल्याने जनशताब्दी सुरू करण्याच्या उद्देशालाच मध्य रेल्वे प्रशासनाने हरताळ फासला आहे. ही गाडी पूर्ववत सीएसटीपर्यंत सुरू करण्याचा रेटा लोकप्रतिनिधी व प्रवासी संघटनेने लावला आहे. औरंगाबाद, जालना, बीड व परभणी येथील नागरिकांना कामानिमित्त दररोज मुंबईला जाता यावे यासाठी जनशताब्दी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. सकाळी 6 वाजता औरंगाबादहून निघाल्यानंतर दुपारी 12.30 वाजेपूर्वी गाडी सीएसटी स्टेशन गाठते. परतीच्या प्रवासाला दुपारी 1.45 वाजता गाडी सुटल्यानंतर नाशिक, मनमाडमार्गे रात्री 8.30 वाजता औरंगाबादला पोहोचते. नंदीग्राम व देवगिरी एक्स्प्रेसचा विस्तार अनुक्रमे नागपूर व सिकंदराबादपर्यंत झाल्यामुळे औरंगाबादकरांना हक्काची गाडीच शिल्लक राहिली नाही. तपोवन >एक्स्प्रेस नांदेडहून निघत असल्याने ती दुपारी 2.40 वाजता औरंगाबादला पोहोचते. त्यामुळे जनशताब्दीला मोठी गर्दी होते. औरंगाबाद-दादरपर्यंतचे तिकीट 142 रुपये आहे.
> सीएसटीपर्यंत गाडी न जाण्याने नुकसान
>प्रवास 15 मिनिटांचा, वाया जातो दीड तास
>प्रवाशांना 15 कि.मी. अलीकडे म्हणजे दादरला उतरावे लागते
>दादरपासून पुढे टॅक्सीने जाण्यासाठी तीनशे ते चारशे रुपयांचा अतिरिक्त खर्च, वेळेचा अपव्यय

लोकलने सीएसटीपर्यंत पोहोचण्यासाठी 8 ते 10 रु. लागत असले तरी गर्दीमुळे प्रवाशांची होते दमछाक

दादर ते सीएसटीचा रेल्वे प्रवास 15 मिनिटांचा असला तरी टॅक्सी अथवा बेस्ट बसने प्रवास करण्यासाठी एक ते दीड तासाचा लागतो वेळ

सीएसटीवर गाड्या उभ्या करण्यासाठी पुरेशी जागा नाही. शिवाय मागील दोन वर्षांपासून रेल्वेमार्गांची संख्या वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सतत मेगाब्लॉक करावा लागत आहे. त्यामुळे जनशताब्दी एक्स्प्रेस सीएसटीपर्यंत नेण्याऐवजी दादरपर्यंतच जात आहे.

जाण्याने फायदे
>प्रवाशांच्या वेळेची व पैशाची बचत
>बस किंवा टॅक्सीने सीएसटीहून मंत्रालयापर्यंतचे अंतर केवळ दहा मिनिटांचे
>पाच वाजेपूर्वी मंत्रालयातील काम आटोपल्यानंतर सीएसटीहून निघणार्‍या 4.45 च्या नंदीग्राम किंवा रात्री 9.30 च्या देवगिरी एक्स्प्रेसने परत येता येईल.

मागणी पाच डब्यांची; मिळाला एक
जनशताब्दीमध्ये यापूर्वी एक वातानुकूलित व आठ द्वितीय र्शेणी असे नऊ डबे होते. संपूर्ण गाडी ही चेअर कार (सीसी) आहे. पाच डबे वाढवण्याची मागणी करण्यात येत असताना केवळ एकच डबा वाढवण्यात आला. सध्या डब्यांची संख्या दहा झाली आहे. एका डब्यात 10> प्रवासी याप्रमाणे दर दिवशी मुंबईला जाणार्‍या-येणार्‍यांची संख्या 10>0 वर जाते.

गाडी सीएसटीपर्यंत धावेल
> औरंगाबादहून मुंबईला जाण्यासाठी जनशताब्दीसह एका गाडीची आवश्यकता आहे. रात्री 7 ते 8 वाजेदरम्यान मुंबईसाठी औरंगाबादहून रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात येईल. मुंबईतील मेगाब्लॉकमुळे काही काळासाठी जनशताब्दी दादरपर्यंत धावेल. रेल्वे रुळांचे काम पूर्ण झाल्यानंतर गाडी लवकरच सीएसटीपर्यंत जाईल.
- खासदार चंद्रकांत खैरे, औरंगाबाद

प्रवासी नसल्याची ओरड निर्थक
> जनशताब्दीला प्रवासी कमी असल्याची ओरड मध्य रेल्वे करत आहे. औरंगाबादहून मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना आरक्षण मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जनशताब्दी दादरऐवजी सीएसटीपर्यंत चालवावी. प्रवासी नसल्याची ओरड निर्थक आहे.
-ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती