आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावनांशी खेळ केल्याच्या निषेधार्थ दरवर्षी 25 जून ‘ब्लॅक डे’ पाळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील आंबेडकर भवन पाडणाऱ्यांवर अद्याप कारवाई केल्याच्या निषेधार्थ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (२५ जून) मोर्चा काढला. छाया : मनोज पराती - Divya Marathi
मुंबईतील आंबेडकर भवन पाडणाऱ्यांवर अद्याप कारवाई केल्याच्या निषेधार्थ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (२५ जून) मोर्चा काढला. छाया : मनोज पराती
औरंगाबाद- दादर येथील आंबेडकर भवन पाडल्याच्या घटनेला २५ जून रोजी वर्ष पूर्ण झाले. या घटनेतील दोषींवर अद्याप कारवाई करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ आंबेडकर भवन बचाव कृती समितीच्या वतीने रविवारी (२५ जून) मोर्चा काढण्यात आला. भावनांशी खेळ केल्याच्या निषेधार्थ दरवर्षी २५ जूनला ‘ब्लॅक डे’ पाळणार असा निर्धारही करण्यात आला.
 
भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, भारतीय बौद्ध महासभा, लाल निशाण पक्ष, पँथर्स सेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, श्रमिक मुक्ती दल, सम्यक विद्यार्थी आंदोलन, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, मराठवाडा लेबर युनियन, ऑल इंडिया यूथ फेडरेशन या संघटना मोर्चात सहभागी झाल्या.
 
मोर्चासाठी एकत्र आलेल्या आंबेडकर अनुयायांनी रस्त्यावर उतरून दोषींवर कारवाई करा, अशी घोषणाबाजी केली. मोर्चात सहभागी झालेल्या विद्रोही जलसा चळवळीच्या कार्यकर्त्यांनी क्रांतिगीते सादर करून उत्साह वाढवला. पावसातही भीमसैनिकांचा उत्साह कायम होता. अॅड. बी. एच. गायकवाड यांनी क्रांती चौकातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी मोर्चास झेंडी दाखवली. उद्धव भवलकर, प्रा. राम बाहेती, के. व्ही. मोरे, रतनकुमार पंडागळे, कॉ. भीमराव बनसोड, पंडित मुंडे, पंडित तुपे, बुद्धप्रिय कबीर, अमित भुईगळ, मुकुंद सोनवणे, अशोक कांबळे, अण्णा खंदारे यांनी नेतृत्व केले. नूतन कॉलनी, सिल्लेखाना, पैठण गेट, टिळक पथ, संभाजीपेठ, खडकेश्वर, मिल कॉर्नर, पोलिस आयुक्तालय, महावितरण कार्यालयमार्गे मोर्चा भडकल गेटजवळ पोहोचला. मनोहर टाकसाळ, मंगेश निकम, अण्णा खंदारे, देविदास साथी, डॉ. जनार्दन पिंपळे, अॅड. सुभाष गायकवाड, प्रवीण म्हस्के, भरत दाभाडे, प्रा. सावंत, माणिक करवंजे, मधुकर चाबुकस्वार, के. डी. गायकवाड, उत्तम पंडागळे, सचिन भोळे, सखाहरी बनकर, किरण त्रिभुवन, परभणीचे दिलीप हणवंते, उत्तम कांबळे, चुन्नीलाल जाधव, श्रीरंग ससाणे यांच्यासह मराठवाड्यातून मोर्चेकरी सहभागी झाले.
 
नांदेडहून नागेश सावंत, परभणीहून सुरेश शेळके, जालन्याहून प्रवीण कुंकटे, बी. आर आव्हाड, लखन सोनदारमल, धम्मानंद साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
 
अस्मितेला धक्का लावल्याचा निषेध 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या भवनावर बुलडोझर चालवणाऱ्या रत्नाकर गायकवाड सहकाऱ्यांनी अस्मितेला धक्का लावून भावनेशी खेळ केल्याच्या निषेधार्थ प्रत्येक वर्षी २५ जूनला ब्लॅक डे म्हणून पाळणार असल्याचे आंबेडकर भवन बचाव कृती संयोजन समितीचे विजय वाहूळ, बुद्धप्रिय कबीर, अमित भुईगळ, अभय टाकसाळ यांनी सांगितले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...