आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद-नगर रोडवर लिंबेजळगाव टोलनाक्यावर सशस्त्र दरोडा, चार लाख लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद-अहमदनगर रस्त्यावरील लिंबेजळगाव टोलनाक्यावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. रविवारी रात्री लिंबेजळगाव टोलनाक्यावर सशस्त्र दरोडेखोर दाखल झाले त्यांनी टोलनाक्यावरील कर्मचा-यांना मारहाण करुन चार लाख रुपये लंपास केले आहेत.
(देवगिरी एक्स्प्रेसवर परतुरजवळ दरोड्याचा प्रयत्न, आठ दरोडेखोर जेरबंद )
या घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे तपास सुरु केला आहे.

औरंगाबाद-नगर रस्त्यावर नाकाबंदी करुन दरोडेखोरांचा कसून शोध सुरु आहे.