आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग करणार्‍या शिक्षकांवर कारवाईत भेदभाव केला; स्थायीच्या बैठकीत जगदीश सिद्ध यांचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पालिकेचा एक शिक्षक आणि मुख्याध्यापकाने शाळेतच महिलेचा विनयभंग केला. शिक्षकाला तातडीने निलंबित करण्यात आले. मुख्याध्यापक शेख अहमद शहानूर पटेल याला मात्र दोन महिन्यांनंतरही सूट देण्यात आली. केवळ आर्थिक व्यवहारामुळे हा दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप नगरसेवक जगदीश सिद्ध यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला.
या मुख्याध्यापकाला तातडीने निलंबित करण्याचा आदेश सभापती नारायण कुचे यांनी दिला. त्यानंतर रात्री उशिरा आयुक्तांनी निलंबनाच्या आदेशावर सही केली.
सहा महिन्यांपूर्वी शिक्षकाने महिलेचा विनयभंग केला होता. वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेच्या वतीने स्वत:हून दखल घेण्यात आली. तिसर्‍याच दिवशी नियमानुसार त्याला निलंबित करण्यात आले. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी मुख्याध्यापक पटेल यानेही शाळेतच महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली. त्याला अटक करण्यात आल्यानंतर काही दिवस तो हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.
नियमानुसार 24 तास कर्मचारी कोठडीत असेल तर त्याला निलंबित करावेच लागते. मात्र पटेल हा न्यायालयातून सुटल्यानंतर दुसर्‍याच दिवशी कामावर रुजू झाला होता.