आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरप्रीत चौकातील भुयारी मार्गासाठी सर्वेक्षण सुरू; डिसेंबरमध्ये निविदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील अमरप्रीत चौकात भुयारी मार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्य शासनाने या कामासाठी तातडीने २१ कोटी रुपये मंजुर केले आहे. रस्ते विकास महामंडळाकडून सर्वे नकाशा तयार करण्याचे काम सुरू आहे.
आमदार खासदारांनी त्यांचा निधी दिल्याने शहर एकात्मिक योजनेअंतर्गत केली जाणारी अनेक कामे रस्ते विकास महामंडळाकडून थांबवली गेली. जालना मार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी अपघाताचे प्रमाण बघता महामंडळाने राज्यशासनाकडे पाठपुरावा करून या रस्त्यावरील तीन उड्डाणपुलाची कामे सुरु केली. मोंढा नाका उड्डाणपुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले. त्यानंतर अमरप्रीत चौकात वाहतुकीची कोंडी वाढली आहे. रोपळेकर हॉस्पिटलकडून येणारी वाहने खोकडपुऱ्याकडे जातांना अनेक वाहनधारकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. एक महिन्यानंतर वित्त विभागाने या प्रस्तावास मंजुरी देत २१ कोटी रुपये मंजूर केले. या मंजुरीचे प्रत्र हाती पडताच एमएसआरडीसीने सर्वेक्षण नकाशा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. डिसेंबरपर्यत या कामाची निविदा काढून जानेवारीपासून काम सुरू होईल.

नकाशा सर्वेक्षणाचे काम सुरू
वित्तमंत्रालयाकडून गुरुवारीच मंजुरीचे पत्र मिळाले आहे. शहरातील पहिला भुयारीमार्ग अमरप्रीत चौकात होणार असून वर्षभरात काम पूर्ण केले जाईल. नकाशा तयार केला जात असून, डिसेंबर अखेर निविदा काढण्यात येतील. उदयबर्डे, उपअभियंता,एमएसआरडीसी

असा राहील भुयारी रस्ता
रोपळेकरहॉस्पिटल मार्गे येणारी सर्व वाहने अमरप्रीत चौकातील भुयारी मार्गे खोकडपुरा , औरंगपुरा, पैठण गेट, बसस्थानक, आमखासमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जातील. या चौकात होणारा हा मार्ग १० फुट उंचीचा म्हणेजच ३.५ मीटर उंचीचा तर २२ फुट रुंदीचा म्हणजेच ३० मीटर रुंदीचा दोन पदरी मार्ग असणार आहे. याची लांबी ३५० ते ४५० मीटर राहील. या मार्गात दोन्ही बाजूस प्रत्येकी तीन फूट रुंदीचे पाथ-वे राहतील. या भूयारी मार्गात दिवसरात्र विद्युत दिव्यांची व्यवस्था राहील. वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी असे भुयारीमार्ग पुणे- पिंपरी-चिंचवड मार्गावर तयार करण्यात आलेले आहेत.