आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad And Navi Mumbai Municipal Corporation Election Campaign Stop Today

महानगरपालिका निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी शांत, चार दिवस ड्राय डे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद / नवी मुंबई - औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगर पालिका निवडणूकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी पाच वाजता शांत झाली. यामुळे लाऊड स्पिकरवरील कर्णकर्कश्य घोषणा आणि जाहीर सभांमधून आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी थांबल्या असल्या तरी उमेदवारांचा भर प्रत्यक्ष मतदारांच्या गाठी-भेटीवर असणार आहे. 22 एप्रिल रोजी दोन्ही महानगर पालिकांसाठी मतदान होईल आणि 23 तारखेला मतमोजणी केली जाईल.

मागील 12-13 दिवसांपासून शहरात प्रचाराचा नुसता धुराळा उडाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पक्ष आणि राज्याच्या राजकारणात नव्यानेच मुसंडी मारत असलेल्या एमआयएमच्या प्रचाराने औरंगाबाद आणि नवी मुंबईत कोणत्याही रस्त्याने जात असताना फक्त प्रचाराचाच आवाज ऐकायला मिळत आहे. तो आज शांत होईल. गेल्या दहा - बारा दिवसांमध्ये उमेदवारांनी जाहीर सभांपासून कॉर्नर बैठका, प्रचार फेरी, पदयात्रा, सोशल मीडियावरुन प्रचाराची राळ उठवली होती.

आता उरलेल्या एक-दीड दिवसात उमेदवार प्रत्येक मतदारांचा उंबरा झिजवून मतांचा जोगवा मागतिल आणि मतदानादिवशी प्रत्येक मतदाराला बाहेर काढणे ही मोठी कसरत उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना करावी लागणार आहे.

पुढील स्लाइडमध्ये, चार दिवस ड्राय डे