आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतूर किल्ल्यातून दोन टनांच्‍या तोफेची चोरी, गुन्‍हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - पुरातत्त्व खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अंतूर या किल्ल्यावरील चक्क शिवकालीन तोफच चोरीला गेल्याची घटना आठ डिसेंबरला घडली असून याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंतूर किल्ल्यात असलेल्या टाकीजवळच ही ऐतिहासिक तोफ अनेक वर्षांपासून पडून होती. सदरील किल्ला भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाअंतर्गत असून त्याची देखभाल व सुरक्षा हाच विभाग सांभाळतो. येथे सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक असूनही तोफ चोरीस गेली कशी, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तालुक्यात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे आहेत. मात्र, ही स्थळे पर्यटन विकासापासून कोसो दूर आहेत. किल्ले अंतूर परिसरात सर्वत्र झाडे वाढलेली असून मूळ इमारत ढासळत चालली आहे. येथील किल्ल्याचा मूळ लाकडी दरवाजादेखील जाळून टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य गेटवरील अरबी भाषेतील शिलालेख जेथे आहे तेथेही झाडेझुडपे वाढलेली आहेत. किल्ल्याचे कोठार, प्रवेशद्वार, तटबंदी, कडेलोट या सर्वांतून झाडे फोफावत आहेत.