आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाल नाट्य महोत्सात बालकलाकारांची ‘फॅँटसी’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: आधुनिकतेचे वारे कितीही वेगाने वाहत असले, तरी आजीबाईच्या बटव्यातील पौराणिक अन् काल्पनिक गोष्टी संस्कारांसाठी गरजेच्या असल्याचे वास्तव बालकलाकारांनी मांडले. तापडिया नाट्य मंदिरात सुरू असलेल्या बाल नाट्य महोत्सात शुक्रवारी जय हो फॅँटसी हे नाटक सादर झाले. बालसाहित्यात पुन्हा एकदा पौराणिक आणि ऐतिहासिक पात्रांचे लेखन होण्याची गरज त्याद्वारे मांडण्यात आली.
असिफ अन्सारी लिखित आणि सय्यद अहमद दिग्दर्शित जय हो फॅँटसी हे नाटक सनी कलामंच किल्लेधारूर, बीड येथील बालकलावंतांनी सादर केले. विक्रम आणि वेताळाच्या काल्पनिक आणि पौराणिक गोष्टीच्या माध्यमातून होणारे संस्कार याचे दर्शन त्यातून घडवण्यात आले. आजच्या युगात माणसाला माणूस बनवणे अवघड झाले आहे. त्यासाठी ही पात्रे कशी मदत करतात हे सांगत बालसाहित्यातून नष्ट झालेले बालविश्व कसे गरजेचे आहे याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.बालसाहित्यिकांनी साहित्यातून काल्पनिक जग नष्ट करू नये, असे आवाहन जय हो फॅँटसीच्या माध्यमातून करण्यात आले.
विक्रमचे वेताळाला शट्अप म्हणणे अन् वेताळाचे मिशकिलीने हसत सॉरी म्हणणे, चेटकिणीचे राक्षसाला चिडवणे याप्रसंगांनी बालकांना खळखळून हसवले.
नाटकात विक्रमची भूमिका अभिनय तालखेडकर, वेताळ - अवधूत माने, राक्षस अभिषेक विधाते, भूत-सौरभ बेंद्रे, जीन - रमन सारडा, चेटकीण - ऐश्वर्या सांगळे, लेखक देवदत्त देशपांडे यांनी साकारल्या. अकोला येथील अँड. प्रशांत दीक्षित, नाशिकच्या भाग्यर्शी काळे, नागपूरचे प्रदीप आदेवार परीक्षक म्हणून काम पाहत आहेत.
तापडिया नाट्य मंदिरात सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण यांच्या वतीने 51 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव, हिंदी नाट्य स्पर्धा 2011-2012 व 9 वा बालनाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.