आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Bank Lockers Of PWD Engineer's 23 Lack

औरंगाबादेतील बँकेत चिखलीकरचे 23 लाख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नाशिकच्या बांधकाम विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकरचे येथील दोन बँकांमधील खाती गोठवण्यात आली. ही कारवाई सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केली. त्याच्या खात्यांमध्ये 22 लाख 49 हजार रुपये होते. पोलिसांनी या खात्यांवर कोणत्याही स्वरूपाचा व्यवहार करू नये, असे पत्र बँकेच्या व्यवस्थापकाला दिले.

चिखलीकरने आंध्रा बँकेत वडिलांच्या नावे 11 लाख 87 हजार रुपये ठेवले होते.वाळूजमधील अवी इंजिनियरिंग कंपनीच्या तसेच पत्नी स्वातीच्या नावे पंजाब नॅशनल बँकेत 10 लाख 62 हजार आहेत. या कारवाईचे पत्र नाशिकच्या पोलिसांनाही पाठवले आहे.