आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने \'संसद भवना\'त केली श्रींची प्रतिष्ठापना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यासह देशभरात सोमवारी वाजत गाजत गणरायाचे आगमन झाले. घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणेश मंडळ आणि विविध राजकीय पक्षांनीही गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. येथील भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी संसदेची प्रतिकृती तयार करून त्यात गणराय विराजमान केले आहे.

आगामी निवडणूकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळू दे असे साकडे भाजपचे संसदेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी घातले आहे. पक्षाचे प्रचार प्रमुख आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना लवकरच पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर भाजपची प्रचार समिती आणखी जोमाने कामाला लागेल. औरंगाबादमध्ये मात्र, भाजप कार्यकर्त्यांनी संसदेची प्रतिकृती तयार करून त्यात गणेशाची स्थापना केली आहे. आगामी निवडणूकीत भाजपला यश मिळू दे, अशा या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत.


पुढील स्लाइडमध्ये पाहा, संसदेतील गणराय.