आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करा, सतयुग आपोआप येईल’: ब्रह्मकुमारी सिस्टर शिवानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- इतरांमुळे आपले जीवन सुखकर नाही. अमुक व्यक्ती असा वागतो, त्याने असे वागावे या संघर्षात आपण आयुष्याचा आनंद घालवून बसतो. दुसऱ्याला बदलण्याचा निरर्थक प्रयत्न आपण करत राहतो. त्याऐवजी आपण स्वत: बदलून जावे हा सर्वात प्रभावी आणि आनंददायी उपाय आहे. इतरांबद्दल चांगला विचार करायला लागल्यास सतयुग आपोआपच येईल, असा सल्ला ब्रह्मकुमारी शिवानी यांनी दिला. 
 
शहरात कार्यक्रमांनिमित्त आल्या असताना दिव्य मराठी प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला. या मुलाखतीत त्यांनी जगातील सर्वात अद‌्भुत आणि चमत्कारिक गोष्टीबद्दल उत्स्फूर्त विचार मांडले. प्रत्येकाला मार्गदर्शक, प्रेरणादायी ठरेल अन् परिणाम दाखवेल अशा रहस्याचा उलगडाही त्यांनी केला. 
 
सिस्टर शिवानी म्हणाल्या, पत्रकारिता विश्वात काम करणाऱ्यांची माध्यमांची जबाबदारी समाजमन घडवण्यात खूप मोलाची आहे. गुन्हेगारी आणि राजकारण विश्वाच्या बातम्यांना विनाकारण रंजकता निर्माण करून मीडिया संपूर्ण समाजाला त्या घटनेभोवती गुंफतो. घटना सर्वांपर्यंत पोहाेचणे गरजेचे आहेच, पण त्यातील सूक्ष्म बाबी ज्यामुळे वाचकाच्या डोळ्यांपुढे संपूर्ण चित्रपट निर्माण होईल अशा पद्धतीने देण्यामुळे गुन्हेगारी, भ्रष्टाचार वाढला आहे. पूर्वी दूरदर्शनवर मोजक्या, निवडक बातम्या अतिशय साधेपणाने दिल्या जायच्या त्यामुळे समाजमन शांत आणि सुरक्षित होते. 
 
विचार संकल्प जगातील अदभुत जादू आपल्या हाती : जगातीलसर्वात अदभुत आणि चमत्कारिक गोष्ट म्हणजे आपले विचार आहेत. आपल्या विचारांतून संकल्प तयार होतात आणि तेच आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटनेला घडवून आणतात. मनुष्याच्या हाती ही सर्वात मोठी जादूची छडी आहे आणि तो तरीही संघर्षमय आयुष्य जगतो आहे. 

आपल्या हातातील या छडीचा वापर करत प्रत्येकाने जीवन सुखकर करायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला. विचारांची अदभुत शक्तीच विश्वाचे संचालन करते आहे, याची प्रचिती मी रोज घेते आणि आपल्यापैकी अनेक जण घेतात, पण त्यांना हा बिंदू पकडमध्ये येत नाही, असेही त्यांनी सांगितले.
 
तडजोड करणारे अन् झुकणारे स्वस्थ आहेत 
जे लोक प्रत्येक घटनेत तडजोडीला तयार असतात, झुकून जायला तयार होतात ते स्वस्थ असतात. आपला व्यवहार दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नका. दुसरा तसा वागला नाही म्हणून मीही आता असे वागेन हे सर्वात चुकीचे वर्तन आहे. आपले सौंदर्य आणि बलस्थान कधीच दुसऱ्यामुळे सोडू नका. ईर्षा हा विश्वातील सर्वात भयंकर आजार आहे.
 
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जागरूक राहा 
मोठ्या घटना आपल्यावर गंभीर परिणाम करतात. पण, याचा बारकाईने विचार करा. की प्रत्येकाचे आयुष्य हे चांगल्या-वाईट घटनांनी भरलेले आहे. दिवसभरात घडणाऱ्या ते १० लहान लहान घटनांत आपण कसा प्रतिसाद देतो तसाच आपला संस्कार बनतो. त्यामुळे लहान घटनांत जागरूक रहाल तर मोठ्या घटनांमध्ये चमत्कारिक परिणाम दिसेल. 
बातम्या आणखी आहेत...