आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालयांत अडकले शहरातील नाल्यांचे रेखांकन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन या दोन कार्यालयांच्या दुष्टचक्रात शहरातील नाल्यांची रुंदी शोधण्याचे काम अडकल्याचे समोर आले आहे. सोमवारी रेखांकनाचा र्शीगणेशा झाला आणि दुसर्‍या दिवसापासून या कामाला लगेच विर्शांती देण्यात आली. आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी रेटा लावल्याने येत्या दोन दिवसांत हे काम पुन्हा सुरू होणार आहे.
नाल्यांचे रेखांकन करण्याची घोषणा डॉ. भापकर यांनी केली होती. त्यासाठी मनुष्यबळाचा अभाव असल्याचे कारण पुढे करून सिटी सर्व्हे विभागाने प्रथम असर्मथता दर्शवली. मात्र पालिकेचेही मनुष्यबळ देण्याबरोबरच खासगी संस्थांची मदत घेण्याचे सांगण्यात आल्यानंतर हा विभाग तयार झाला. त्यासाठी 20 लाख रुपये पालिकेने मोजले. शहरातील 18 नाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार होते. एका नाल्यासाठी 8 दिवस या न्यायाने किमान दोन महिन्यांत काम पूर्ण होईल, असे अपेक्षित होते. त्यानंतर एकेका नाल्यातील अतिक्रमणे समोर येणे शक्य होणार असून सर्वेक्षण पूर्ण झालेल्या नाल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम हाती घेण्याची तयारी डॉ. भापकर यांनी चालवली होती. मात्र मागच्या सोमवारी रेखांकन सुरू झाल्यानंतर दुसर्‍याच दिवसापासून ते बंद झाले.
सिटी सर्व्हे विभागाकडे विचारणा केली असता पालिकेने 20 लाख रुपये दिले नसल्याचे कारण त्यांनी पुढे केले होते. मात्र, या विभागाकडून मागणी होताच रक्कम अदा करण्यात आल्याचे सांगण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य कामांमुळे रेखांकनाचे काम थांबवण्यात आल्याचे कळवण्यात आले.
‘त्या’ तीन इमारती पाडणार - जयभवानीनगरात पाणी शिरण्यासाठी कारणीभूत ठरणार्‍या तीन इमारती तातडीने पाडण्याचा विचार झाला होता. मात्र, अजून तेथील रेखांकन झालेले नाही. त्याचा अहवाल शहर अभियंता मुरलीधर सोनवणे यांच्याकडून मागवण्यात आला असून येत्या दोन दिवसांत त्या इमारतींवर बुलडोझर फिरवण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे डॉ. भापकर यांनी सांगतिले. त्या तीन इमारती पाडण्यासाठी रेखांकनाची गरज नसली तरी अन्य इमारतीही प्रवाहात येत असतील तर बुलडोझर तसे परत फिरणार नाही. त्यामुळे थोडासा विलंब होत आहे.
शहरातील नाल्यांची संख्या- 18
रेखांकनासाठी लागणारा कालावधी- एका नाल्यासाठी सरासरी 8 दिवस
त्यामुळे आठ दिवसांनंतर एका नाल्यातील अतिक्रमणे पाडणे शक्य होईल.
2007 मध्ये करण्यात आलेल्या रेखांकनात या नाल्यांवर साडेआठशे अतिक्रमणे होती.
आता ही संख्या काही हजारांत गेली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सिटी सव्र्हे विभागात नोकर भरती असल्यामुळे रेखांकनाचे काम सुरू झाल्यानंतर थांबले होते. पालिकेने त्यांना 20 लाख रुपये अदा केले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पुन्हा रेखांकनाचे काम सुरू होईल. एका आठवड्यानंतर एकेका नाल्यांवरील अतिक्रमणे स्पष्ट होतील आणि त्यानुसार कारवाई शक्य होईल. मोठय़ा पावसात घरांत पाणी शिरणार नाही याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. ’’ डॉ. पुरुषोत्तम भापकर, आयुक्त.