आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्ते सांभाळताना उमेदवारांची पंचाईत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - छावणीपरिषदेच्या मतदानाला अजून २८ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. कार्यकर्ते सांभाळताना उमेदवारांच्या नाकीनऊ येत आहेत. यामुळे आतापासून उमेदवार वैतगाले असून एवढ्या दिवस कार्यकर्त्यांची सोय कशी करायची, असा प्रश्न काही उमदेवारांना पडला आहे.
छावणी परिषदेच्या सात वॉर्डांसाठी शिवसेना, भाजप, अपक्ष उमेदवारांसह सर्वच उमदेवार प्रचाराच्या कामाला लागले आहेत. दिवसभर प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारांना सांभाळावे लागते. यंदा जास्त उमेदवार झाल्यामुळे प्रचारातही चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना,भाजपच्या उमेदवारांना अपक्षांचे आव्हान असल्यामुळे प्रमुख उमेदवारांना ही निवडणूक जास्तच गांभार्याने घ्यावी लागत आहे. छावणीवर नेहमीप्रमाणे आपलेच वर्चस्व कायम राहावे यासाठीशिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, तर मोदी लाटेत आपलेच उमेदवार निवडून आले पाहिजेत यासाठी भाजपने ही निवडणूक जास्तच गांभीर्याने घेतली आहे. छावणी परिषदेची निवडणूक जेवढी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची आहे तेवढीच अपक्षांसाठीही.विशेष म्हणजे जास्त उमदेवार असल्यामुळे कार्यकर्ते दुसऱ्या उमेदवाराकडे पळून जातील. त्यामुळे त्यांची योग्य ती देखभाल करावी लागत आहे. छावणी परिसरात उमेदवारांना कार्यकर्त्यांची जास्त काळजी घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे.
मतदानाला जास्त कालावधी मिळत असल्यामुळे उमेदवारांच्या खर्चातही वाढ होणार आहे. काही उमेदवारांनी म्हटले की,निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असते. मतदानापर्यंत कार्येकर्ते सांभाळावे लागतात. मतदानाला खूप वेळ शिल्लक आहे. त्यामुळे तेवढ्या दिवस कार्यकर्ते सांभाळावेच लागणार आहेत.

कार्यकर्त्यांची मजा
जास्तउमेदवार रिंगणात असल्यामुळे कार्यकर्त्यांची मजा झाली आहे. कार्यकर्ते दुसऱ्या उमेदवाराकडे पळून जातील, अशी भीती उमेदवारांना असते. त्यामुळे कुणालाही नाराज केले जात नाही.