आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासात प्रथमच जिल्‍हा परिषद सीईओंची खुर्ची जप्त, यापूर्वी गाडी जप्‍तीची झाली होती कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-  अंधारी येथील जिल्हा परिषद शाळा इमारत बांधकामाचा थकीत निधी वेळेत अदा न केल्यामुळे मंगळवारी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांची खुर्ची जप्त करण्याची नामुष्की ओढवली. इतिहासात पहिल्‍यादांच सीईओंवर अशाप्रकारे कारवाई करण्‍यात आली. याआधी जिल्‍हा परिषद सीईओंची गाडी जप्‍त करण्‍यात आली होती. विशेष म्हणजे २९ वर्षांपासून हे थकीत निधीचे प्रकरण रेंगाळले आहे.
 
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत १९८८ मध्ये अंधारी (ता. सिल्लोड) येथे जि. प. शाळेच्या इमारतीचे बांधकाम टी. ए. चोपडा कन्स्ट्रक्शनला देण्यात आले होते. २० लाखांचे हे कंत्राट होते. शाळा बांधताना काही अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे काम रखडल्याने प्रशासनाने कंत्राटदारावर कारवाई केली. याविरुद्ध तो न्यायालयात गेला. १५ जुलै रोजी न्यायालयाने कंत्राटदाराला व्याजासह प्रलंबित असलेली ४३ लाख १७ हजार ६० रुपये रक्कम वसुलीची परवानगी दिली. प्रशासनाने निधी जमा न केल्यामुळे जप्तीच्या कारवाई केली.
 
तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर खुर्ची जप्त : बेलिफ संबंधित कंत्राटदारासह मंगळवारी दुपारी सीईओंच्या दालनात हजर झाले. सीईओ आर्दड यांनी शाळा बांधकाम प्रकरणाची फाइल काढण्याच्या सूचना बांधकाम प्रशासनाला दिल्या. मात्र, तीन तास थांबूनही फाइल सापडली नाही. अखेरीस सीईओंची खुर्ची, संगणक तसेच बांधकामच्या निविदा विभागातील संगणक सील करून जप्त करण्यात आले.
 
बातम्या आणखी आहेत...