आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिडकोतील भूखंडावर तब्बल 30 वर्षे अवैधरीत्या अतिक्रमण केल्याप्रकरणी घाटीतील डॉ. आर. के. महिंद्रा या डॉक्टरसोबतच या गोष्टीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करणार्या सिडकोतील अधिकार्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी आज केली. याप्रकरणी 7 फेब्रुवारी रोजी डीबी स्टारने ‘डॉक्टरांचे अतिक्रमण, सिडकोची मलमपट्टी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर आज शहरभरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
हे चुकीचेच
-सर्वांनीच नैतिकता सोडली आहे. लहानसहान फायद्यासाठी पदाचा गैरवापर करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. त्यांच्या पदाला हे कृत्य शोभत नाही. -महिंद्र -सोमशेट्टी, -ज्येष्ठ नागरिक
सिडकोला दोन सवाल
-मुख्य प्रशासक वळवी यांनी माझ्या दोन प्रश्नांची उत्तरे द्यावीत. हा भूखंड विकण्याजोगा आहे, तर मग 30 वष्रे सिडको कशाची वाट बघत होते? सिडकोकडे मालमत्तांचा तपशील नाही का?
-निरंजन लालसरे, -सिडको
नव्याने सर्वेक्षण करा
>अशा कितीतरी मालमत्तांवर मालकी सांगणारे महाभाग आहेत. अधिकार्यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्यच नाही. सिडकोने नव्याने सर्वेक्षण करावे. -जगदीश अभ्यंकर, -एन-8
जबर दंड लावा, गुन्हे दाखल करा
>30 वर्षे या भूखंडाचा मोफत वापर केल्याप्रकरणी महिंद्रा यांना जबर दंड लावला पाहिजे, तर या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांवर गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवा. -शेख वाजेद शेख मुतरुझा, -एन-6, सिडको
वळवी साहेब कारवाई करा
-धडाकेबाज प्रशासक म्हणून डी. डी. वळवी यांचा उल्लेख होतो. त्यांनी मनपा आयुक्त डॉ. भापकर यांच्याप्रमाणे अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम हाती घ्यावी.
-डॉ. मीनल संवत्सर, -गारखेडा परिसर.
‘त्या’ नागरिकांचे अभिनंदन
>हाय प्रोफाइल लोकांचा गैरव्यवहार निमूटपणे सहन करण्याची सवय समाजाला लागली आहे. पण डॉ. महिंद्रा यांच्या गैरप्रकाराला वाचा फ ोडणार्या सहा नागरिकांचे अभिनंदन करायला हवे. -गजानन ससाणे, -विद्यापीठ परिसर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.