आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको एन-5 मधील भूखंडावर डॉक्टरचे अतिक्रमण; सिडकोची मलमपट्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको एन- 5, एफ सेक्टर येथे 69 प्लॉटची श्रीनगर कॉलनी आहे. ही शहरातील उच्चभ्रू वसाहत समजली जाते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीतील डेंटल कॉलेजच्या ऑर्थोडोंटिक्स विभागाचे प्रमुख डॉ. आर. के. महिंद्रा हे या कॉलनीतील एका मोकळ्या भूखंडावर स्वत:ची मालकी असल्याचे 30 वर्षांपासून भासवत होते. रहिवाशांचाही त्यावर विश्वास बसला; परंतु त्यांचा हा दावा खोटा असल्याचे उघडकीस आले आहे.

नेमके काय झाले? : सिडकोच्या नकाशाप्रमाणे प्लॉट क्रमांक 41 आणि 42 च्या मधील भूखंड रिक्त आहे. 41 क्रमांकाच्या प्लॉटवर डॉ. महिंद्रा यांचा बंगला आहे तर प्लॉट क्र. 42 वर ब्रrो यांचे घर आहे; पण डॉ. महिंद्रा यांनी सुमारे 30 वर्षांपासून स्वत:च्या बंगल्याला लागूनच असलेल्या या प्लॉटवर तारेचे कुंपण घातले आहे. यामुळे जागेचा कॉलनीसाठी वापर होत नसून ती महिंद्रा यांची खासगी मालमत्ता बनली आहे.

असे फुटले बिंग : ही जागा आपणच विकत घेतल्याचे डॉक्टर सातत्याने सांगत आले. यामुळे रहिवाशांनी कधीच त्यांना विरोध केला नाही. त्यांनी प्लॉटवर सिमेंट-विटांचे पक्के कंपाउंडही बांधले होते, परंतु 2001 मध्ये औरंगाबाद खंडपीठाचे तत्कालीन न्यायमूर्ती बी. एच. मार्लापल्ले यांनी सिडकोतील अतिक्रमणे पाडण्याचा निर्णय दिला होता. त्या वेळी अतिक्रमणविरोधी पथकाने त्यांच्या सिमेंटच्या कंपाऊंडवर हातोडा चालवला होता. यामुळे कॉलनीतील सर्वच रहिवासी थक्क झाले.

दोन पिढय़ांची लढाई : या क ाळात कॉलनीतील बहुतांश लोक नोकरीनिमित्ताने बाहेरगावी होते. 2009 नंतर बरेच लोक निवृत्त झाले व कॉलनीत राहण्यासाठी आले आणि त्यांना हा भूखंड मोकळा व्हायला हवा याची जाणीव झाली. याच काळात शिवाजी दांडगे या तरुणाने माहितीच्या अधिकारात जागेच्या मालकीची माहिती मागवली. त्यातूनच ही जागा डॉक्टरांची नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर रहिवाशांनी डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना ती रिकामी करण्याची मागणी केली, पण डॉक्टर जागा सोडण्यास तयार नाहीत.

सिडकोची मलमपट्टी : या प्रकरणी चमूने मुख्य प्रशासक डी. डी. वळवी यांची भेट घेतली. यावेळी प्रशासक सुधाकर तेलंग, सूर्यवंशी आणि दांडगे नावाचे अधिकारीही उपस्थित होते. वळवी यांनी दोन वेळेस ही जागा ओपन स्पेस आहे की सेलेबल लँड आहे, हे पाहण्यासाठी नकाशाची मागणी केली; पण कर्मचार्‍यांनी त्यांना दाद दिली नाही. देशपांडे नावाच्या कर्मचार्‍यांनी ही सेलेबल लँड असल्याचे सांगीतले. यावरून डॉक्टर महिंद्रा यांनी या जागेवर 30 वष्रे अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले; पण त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून हा भूखंड त्यांनाच मिळणार असल्याचे हे सर्व जण सांगत होते. डॉक्टरही सात दिवसांत हा प्लॉट आपल्या नावावर होणार असल्याचे ठासून सांगत आहेत. यामुळे आतल्या आत तो महिंद्रा यांनाच देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली की काय? असा संशय निर्माण होतो.

नियम काय सांगतो?
ओपन स्पेस असेल तर त्याच्या 10 टक्के भागावर प्री-प्रायमरी स्कूलसारखे उपक्रम चालवता येतात. उर्वरित ओपन स्पेस मोकळीच सोडावी लागते.

>सिडकोच्या मालमत्ता महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. मात्र, जे भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत, त्यांची मालकी अजूनही सिडकोकडेच आहे. ओपन स्पेसवरील अतिक्रमण हटवण्याचे काम महानगरपालिकेचे असते. विक्रीची जबाबदारी मात्र सिडकोचीच आहे.
>सेलेबल लँड म्हणजेच विक्रीसाठी उपलब्ध भूखंडाची विक्री करण्यासाठी सिडकोला नियमाप्रमाणे सर्व प्रक्रिया राबवावी लागते. जाहिरात देणे, अर्ज मागवणे किंवा बोली लावून विक्री करणे हा या प्रक्रियेचा भाग आहे.
>ऑड शेप जागेत त्याला लागून असलेल्या मालमत्ताधारकाला अग्रक्रमाने तो देण्याचा विचार होतो.

डॉक्टरने वाढवला कॉलनीचा बीपी

डॉक्टर तुम्हीसुद्धा ?
डॉक्टरांचे हे कृत्य चुकीचे आहे. त्यांच्या हातून काही चांगले कार्य होण्याची अपेक्षा असताना त्यांनी 30 वर्षांपासून प्लॉटवर ताबा घेतला आहे. त्यांनी त्वरित ही जागा रिकामी करावी.
- शंकरराव जोशी, रहिवासी

प्रक्रिया राबवून प्लॉट विका
डॉक्टरांनी 30 वर्षांपासून अतिक्रमण केले आहे. जर ही जागा विक्रीस क ाढायची असेल तर योग्य पद्धत राबवावी. एकट्या डॉक्टरांना त्यावर दावा करता येणार नाही.
- प्रवीण कुलकर्णी, रहिवासी

दंड वसूल करा
ही जागा डॉक्टरांच्या मालकीची नाही. 30 वर्षांपासून केलेल्या अतिक्रमणासाठी त्यांना सिडकोने दंड लावायला हवा. ही जागा ताब्यात घेऊन सिडकोने हे प्रकरण त्वरित मार्गी लावावे.
-जी. एम. पाटील, रहिवासी

राजकीय वरदहस्त
डॉक्टर महिंद्रा हे पूर्वमधील एका राजकीय नेत्याचे आणि मंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत. यामुळेच त्यांच्यावर कोणीच क ारवाई करत नाही. नगरसेविकाही याकडे दुर्लक्ष करतात.
-अशोक पाटील, रहिवासी

सिडकोचे हात काळे
मुळात ही जागा ग्रीन झोनसाठी राखीव असताना ती यलो झोन कशी झाली, हेच समजत नाही. अधिकार्‍यांना मॅनेज केल्याचा दाट संशय येतो. या प्रकरणाची चौकशी करून दोषींना शिक्षा व्हावी.
-शिवाजी दांडगे, रहिवासी

राजकीय वरदहस्त
डॉक्टर महिंद्रा हे पूर्वमधील एका राजकीय नेत्याचे आणि मंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत. यामुळेच त्यांच्यावर कोणीच क ारवाई करत नाही. नगरसेविकाही याकडे दुर्लक्ष करतात.
-अशोक पाटील, रहिवासी


थेट सवाल-
जागा रिकामी करावीच लागेल
डॉक्टर महिंद्रा यांनी सिडकोच्या जागेवर 30 वर्षांपासून अतिक्रमण केले आहे.
ही जागा ओपन स्पेस आहे, यलो झोनमधील आहे किंवा सेलेबल लँड (विकण्यायोग्य भूखंड) हे बघावे लागेल.

आपल्याकडील कागदपत्रांवरून ही बाब स्पष्ट होऊ शकेल..
(वळवी यांनी तत्काळ संबंधित विभागाचे कर्मचारी देशपांडे यांना बोलावून माहिती घेतली. त्यांनी हा भूखंड सेलेबल असल्याचे सांगितले.) 30 वर्षांपासून त्यांनी अतिक्रमण केले असेल तर ही गंभीर बाब आहे. त्यांना जागा रिकामी करावी लागेल.

कारवाई कधी करणार?
मी स्वत: पाहणी करायला जाईन. त्यांचे अतिक्रमण काढून टाकू.
परंतु डॉक्टर तर ती जागा विकत घेणार असल्याचा दावा करत आहेत?
जर तो ऑड शेप भूखंड असेल तर त्यांना दावा करता येईल. अन्यथा त्याची रीतसर प्रक्रिया राबवून विक्री करावी लागेल. पण तो ऑड शेप भूखंड नाही.
मग त्यांना दावा करता येणार नाही. मी पाहणी केल्यावर ठरवीन की तो ऑड शेप आहे की नाही.
30 वर्षांपासून अतिक्रमण केल्याबद्दल त्यांना दंड लावणार काय?
दंड तर लावावाच लागेल.

डॉक्टरांवर वरदहस्त असल्याचे बोलले जाते?
आम्ही कोणत्याच राजकीय दबावाला बळी पडत नाही. आमच्याकडे कागद बोलतो.

थेट सवाल
मग हे अतिक्रमण ठरत नाही काय?
मजबूत बांधकामाला अतिक्रमण म्हणतात. उलट या मोकळ्या जागेत लोक घाण टाकायचे. मी 6-7 लाख रुपये खचरून या जमिनीचा कायापालट केला आहे. येथे 30-40 झाडे लावली आहेत.
पण ही जागा तुमची नसताना हा खटाटोप तुम्ही कशासाठी केला?
या जागेशी माझी भावनिक गुंतवणूक आहे. रिकामी पडून राहण्यापेक्षा त्याचा चांगला वापर केला आहे. त्यात काय बिघडले?
मग कॉलनीतील लोक आक्षेप का घेताहेत?
तेच मला समजत नाहीय. आतापर्यंत तर ते काहीही बोलत नव्हते. निवृत्तीनंतर त्यांना काही काम राहिलेले नाही.
मुख्य प्रशासक वळवींनीही जागेवर अतिक्रमण असल्याचे मान्य केले आहे.
ते तांत्रिक जाण असणारे अधिकारी नाहीत. सिडकोच्या नगररचना विभागाने मला जागा देण्याचे मान्य केले आहे.
पण तुम्ही जागा सोडून का देत नाही?
जागा सोडण्याचा प्रश्नच नाही. सात दिवसांत हा प्लॉट माझ्या नावावर झालेला असेल.