आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातारा आणि देवळाईनंतर आता औरंगाबाद सिडकोवासीयांना हवी स्वतंत्र नगरपालिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सातारा आणि देवळाईसाठी स्वतंत्र नगरपालिका जाहीर झाल्याने सिडकोतील नागरिकांची स्वतंत्र नगरपालिकेची मागणी पुढे येत आहे. मात्र या मागणीबाबत राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे. ‘दिव्य मराठी’च्या ‘विकासमंच’ या कार्यक्रमात सिडकोसाठी स्वतंत्र नगरपालिकेची मागणी पुढे आली आणि नव्याने या मागणीवर खल सुरू झाला आहे. सिडकोचे हस्तांतर मनपाकडे होण्याआधीही ही मागणी करण्यात आली होती. त्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक काशीनाथ कोकाटेही होते. याशिवाय तत्कालीन नगरसेवक विनायक पांडे यांनी शहराचा मध्य भाग वगळून स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी काही वर्षांपूर्वी केली होती. पण त्या वेळी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

‘दिव्य मराठी’च्या विकास मंच कार्यक्रमातून मागणी
>3.5 लाख लोकवस्तीचा भाग
>40 टक्के उत्पन्न मनपाला
>राजकीय पक्ष संभ्रमात, नेत्यांची मात्र सावध भूमिका

मागणीमागील युक्तिवाद
0 साडेतीन लाख लोकवस्तीच्या सिडको व हडको परिसरातून मनपाला मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीत 35 ते 40टक्के उत्पन्न.
0 उत्पन्नाच्या तुलनेत सुविधा मिळत नाहीत, अशी नागरिकांची खंत आहे. यासाठी स्वतंत्र नगरपालिकेची मागणी निवृत्त तहसीलदार गोरखनाथ पोतदार यांनी मांडली.
0 मनपात राहून आमचा विकास होत नाही. कराच्या रकमेचा योग्य वापर होत नाही. त्यामुळे हे पाऊल उचलावे असा सूर निघाला. या मागणीला उपस्थित नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला.

प्रस्ताव अव्यवहार्य; नेत्यांची नकारघंटा
>सिडको नगरपालिकेची मागणी झाली, पण राजकीय पक्ष मात्र त्यावर संभ्रमात आहेत.
>वेगळे होऊन स्वतंत्र नगरपालिका झाल्याने प्रश्न सुटणार नाहीत, असे नेत्यांचे मत आहे.
>मनपात राहूनच जास्तीत जास्त विकास कसा करून घेता येईल याकडे लक्ष देण्याची गरज
>कोणतीही नगरपालिका स्थापन करायची असेल तर आधी उत्पन्नाचे स्रोत पाहावे लागतात.
>सिडकोसाठी असे कोणतेही स्रोत नसल्याने हा प्रस्ताव व्यवहार्य नाही, असे नेत्यांचे म्हणणे.