आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुकानदारांना सिडकोच्या नोटिसा, निवासी वापराच्या भूखंडांवर हॉटेल्स दुकाने थाटली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद; सिडकोनेनिवासी वापरासाठी दिलेल्या भूखंडांवर आता शोरूम्स, हॉटेल्स दुकाने सुरू आहेत. या मालमत्ताधारकांना सिडकोने नोटिसा बजावल्या असून वापर बदलल्याने दिलेला भूखंड परत का घेण्यात येऊ नये, असा सवाल करत आठ दिवसांत खुलासे मागवले आहेत.

सिडको परिसर सिडकोच्या ताब्यात होता, तेव्हा तेथील भूखंड ज्या कारणासाठी दिला त्याच कारणासाठी वापरला जाईल याची खबरदारी घेतली गेली; पण २००६ पासून सिडको मनपाकडे हस्तांतरित झाल्यापासून बेबंद कारभार सुरू झाला.
अनेक ठिकाणी आता निवासी वापराचे भूखंड व्यावसायिक संकुले बनली आहेत. तेथील घरे गायब होऊन शोरूम्स, हाॅटेल्स, दुकाने सुरू झाली आहेत. सिडकोचे भूखंड हे भाडेपट्टा कराराने दिलेले आहेत. त्या करारानुसार ज्या वापरासाठी हे भूखंड देण्यात आले आहेत त्याच कारणांसाठी त्याचा वापर करणे आवश्यक आहे. सिडकोने याची दखल घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. सिडको एन-३ मधील जालना रोडच्या समांतर रस्त्यावर असणाऱ्या ६० ते ७० बड्यांना नोटिसा दिल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, या भूखंडांवर परवानगीपेक्षा अधिक क्षेत्राचा व्यावसायिक वापर सुरू आहे. त्यामुळे भाडेपट्टा करारातील अटी शर्तींचे उल्लंघन केले असून दिलेला भूखंड परत का घेण्यात येऊ नये, याबाबत आठ दिवसांत खुलासा सादर करावा, नसता याबाबत आपले काही म्हणणे नाही असे गृहीत धरून सिडको पुढील कार्यवाही करेल, असा इशारा सिडकोने दिला आहे.

व्यापाऱ्यांत भीती
यानोटिसांमुळे आतापर्यंत बिनदिक्कतपणे आपले व्यवसाय चालवणारे हादरले आहेत. सिडकोला काय उत्तर द्यायचे, असा पेच त्यांच्यासमोर असून सिडको काय कारवाई करेल, याची भीतीयुक्त उत्सुकता लागली आहे.