आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशीजींनी दिली होती शाबासकी, खूब तरक्की करो; औरंगाबादचे संवत्‍सर यांनी दिला आठवणींना उजाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिल्लीत २००३ मध्ये दिव्यांगांच्या जागतिक स्तरावरील स्पर्धेत सहभाग नोंदवल्यावर आयोजित सोहळ्यात माझी मुलगी आभाने भरतनाट्यम सादर केले. यानंतर पहिल्याच रांगेत बसलेले शशी कपूर अचानक मंचावर आले. बहोत खूब प्रदर्शन किया, खूब तरक्की करो, आगे बढो और दुनिया मे नाम कमाओ अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले. शशी कपूर यांच्या निधनानंतर औरंगाबादेतील अनिल संवत्सर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

 

संवत्सर म्हणाले, माझी मुलगी आभा दिव्यांग (मूकबधिर) आहे. २००३ मध्ये दिल्लीला नॅशनल अॅबिलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने दिव्यांगांसाठी खास स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आभाने चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता. जागतिक स्पर्धेत ती दुसरी आली होती. यानंतर आयोजित रंगारंग सोहळ्यात तिने भरतनाट्यमचे सादरीकरण केले. दिवंगत अभिनेते शशी कपूर या स्पर्धेचे ब्रँड अॅम्बेसेडर होते. तेदेखील या सोहळ्याला उपस्थित होते. आभाला आवाज ऐकू येत नाही, बोलताही येत नाही तरीही तिने केलेले तालबद्ध नृत्य त्यांना चकित करून गेले. त्यामुळे शशी कपूर स्वत: मंचावर आले. आभाला मिठीत घेऊन म्हणाले, बेटा खूब तरक्की करो, आगे बढो और दुनिया में तुम्हारा नाम हो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.

 

मुलीला दिलेली दाद आयुष्याचा अनमोल ठेवा : शशी कपूर यांच्यासारख्या महान अभिनेत्याने एखाद्या दिव्यांग व्यक्तीला सहज केलेल्या सादरीकरणासाठी दिलेली ही दाद आयुष्याचा अनमोल ठेवा आहे. आभा हिच्यासाठी हा सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. त्यांच्यामुळे माझ्या दिव्यांग मुलीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. औरंगाबादशी यानिमित्ताने जोडली गेलेली शशी कपूर यांची ही आठवण त्यांच्या जाण्यानंतर अधिक प्रकर्षाने जाणवू लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...