आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडी वाढल्याने दोन दिवसांपासून शहरावर धुके, नागरिक लुटताहेत अाल्हाददायक वातावरणाचा आनंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गेल्या आठ दिवसांपासून हवामानात वेगाने अनपेक्षित बदल होत आहेत. ढगाळ वातावरणाची स्थिती निवळली असून थंडीचा जोर वाढला आहे. पहाटे ते वाजेपर्यंत शहर परिसरात दाट धुक्याचे आच्छादन पसरलेले असते. जॉगिंग आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना काश्मीरची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. 

 

उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, काश्मीर आदी ठिकाणी दाट धुके असते. पावसाळा, हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे धुक्याचे प्रमाण वाढते. त्याच धर्तीवर जिल्ह्यात दौलताबाद, खुलताबाद, शूलिभंजन, सारोळा, हर्सूल, सलीम अली सरोवर, सातारा डोंगर परिसर, विद्यापीठात मागील दोन दिवसांपासून पहाटे विरळ, सौम्य ते दाट धुक्याचे अाच्छादन दिसत आहे. शहरावर त्याची पांढरी चादर पसरलेली असते. दाट सौम्य धुक्यातून किमीपेक्षा जास्त लांबचे दिसत नाही. त्यामुळे चालकांना दिवे लावूनच वाहन चालवावे लागत आहे. जॉगिंग आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना दाट धुक्याचा सुखद अनुभव येत आहे. 

 

हा होतो परिणाम 

धुक्यानेश्वसनाचे आजार बळावतात. यामुळे नाकाला मास्क, रुमाल बांधून बाहेर पडावे. दाट धुक्यामुळे रस्त्यावरील दृश्यता कमी होते. अपघातांचे प्रमाणही वाढते. वनस्पतीवर परिणाम होतो. दाट धुक्यामुळे ते किमीपेक्षा कमी दिसते. सौम्य धुके असल्यास ते किमी आणि विरळ असल्यास किमीपर्यंत स्पष्ट दिसते. 

 

कशामुळे तयार हाेते धुके?  
२० ते २४ नोव्हेंबरदरम्यान हवामानात बदल होऊन किमान तापमान २० अंशांवर पोहोचले होते. सोमवारी ते १२.४ अंशांवर खाली घसरले. त्यात आणखी घट होईल. थंडीच्या लाटेमुळे धुके निर्माण झाले असून सकाळी वाजेपर्यंत शहरावर धुक्याची चादर पसरते. धुके म्हणजे भूपृष्ठालगत असणारे पांढरे ढग होय, अशी माहिती हवामानतज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...