आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरी नदीला औरंगाबादकर देतात ९० टक्के प्रदूषित पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद शहरातील ९० टक्के सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया करता ते पाणी थेट खाम सुखना नदीद्वारे गोदावरीत जाते. तेच पाणी नाथसागराद्वारे आपल्यापर्यंत येते. शहरातील सांडपाण्यावर प्रकिया केली नाही तर काही वर्षांत गोदावरीतून फक्त प्रदूषित पाणीच आपल्याला मिळेल, असा धोक्याचा इशारा केंद्रीय प्रदूषण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला दिला आहे. खबरदारीचे उपाय उचलण्याचे आदेश दिल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संचालक मंडळाची बैठक मार्च २०१५ मध्ये झाली. त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संचालकांची विशेष बैठक मे २०१५ मध्ये झाली. यात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशभरातील नद्या या शहरातील सांडपाण्यामुळे प्रदूषित होत असल्याचा अहवाल दिला. देशातील सर्वच शहरांची आकडेवारी दिली असून प्रत्येक शहरात ७० टक्के सांडपाणी प्रदूषित आहे. त्याचे गंभीर परिणाम लोकांच्या आरोग्यावर होऊ शकतील, असा निष्कर्ष या अहवालात आहे. यासंदर्भात देशातील सर्वच महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटिसा पाठवून दोन वर्षांत सार्वजनिक सांडपाणी प्रकल्प तयार करून त्याद्वारे प्रक्रिया केलेलेच पाणी नदीत सोडावे, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.
शहरात फक्त दोनच प्रक्रिया प्रकल्प : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासानुसार, औरंगाबाद शहरात फक्त दोनच सार्वजनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहेत. पहिला सलीम अली सरोवर तर दुसरा विमानतळावर आहे. शहराला दररोज १६० दलघमी पाणी लागते. प्रत्यक्षात जायकवाडीतून १४४ दलघमी पाण्याचा पुरवठा होतो. यातील ११० दलघमी पाणी सांडपाणी होऊन शहरातून बाहेर पडते. या पाण्यावर कोणतीही प्रकिया होत नसल्याने हे प्रदूषित पाणी गोदावरी नदीत जाते. शहरासाठी सार्वजनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन वर्षांत शहरात पुरेसे सांडपाणी प्रकिया प्रकल्प तयार करण्याचे आदेश मनपासह स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत.
औरंगाबादची स्थिती गंभीर
देशभरातील शहरांत ७० टक्के पाण्यावर प्रक्रिया होत नाही, असा निष्कर्ष केंद्रीय प्रदूषण मंडळाने काढला आहे. औरंगाबाद शहरात तर ९० टक्के सांडपाण्यावर प्रक्रियाच होत नसल्याने ते प्रदूषित पाणी थेट गाेदावरी नदीत जाते. शहराची स्थिती खूप गंभीर असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांचे मत आहे.
शहरात झोनवाइज एसटीपी शक्य
- औरंगाबाद शहरातील सांडपाण्याची समस्या गंभीर आहे. १०३ वाॅर्डांचे दहा झोन करून प्रत्येक झोनमध्ये एक असा सार्वजनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा केला तर समस्या सुटेल. यासाठी अंदाजे ५० ते ६० कोटी रुपये खर्च येऊ शकतो. मनपाकडे पैसा नसेल तर राज्य शासनाच्या मदतीने हे प्रकल्प सहज उभे राहू शकतात. यामुळे शहरातून बाहेर जाणाऱ्या सांडपाण्याची समस्या सुटेल.
प्रा. डॉ. सतीश पाटील, पर्यावरण तज्ज्ञ
५४ संस्थांना नोटिसा बजावल्या
- माझ्या अखत्यारीत आठ जिल्हे असून त्यात ५४ स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. त्या सर्वांना दोन वर्षांत सार्वजनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले आहेत.
डी. बी. पाटील, विभागीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
१० टक्के पाण्यावर प्रक्रिया
- शहरात सार्वजनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुरेसे नसल्याने फक्त १० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होत असल्याचे आढळले आहे. ९० टक्के पाणी प्रक्रिया होता खांब सुखना नदीत जाते. तेथून ते गोदावरी नदीत पोहोचते. शहरातून ११० दलघमी पाणी प्रक्रिया करता नदीत जाते. यासाठी मनपाने पुढच्या पन्नास वर्षांचा विचार करून २०० दलघमी एवढे पाणी प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभी करावी.
अमोल काटोले, अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
बातम्या आणखी आहेत...