आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सफाईच्या खासगीकरणाचा प्रस्ताव सोमवारी मांडणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील सफाईचे खासगीकरण करण्यात येत आहे. तसा प्रस्ताव मनपा प्रशासनाने तयार केला असून तो सोमवार, 18 मार्च रोजी सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. यापुढे घरोघरी जाऊन कचरा उचलण्यात येणार असल्याने मालमत्ताधारकांकडून शुल्क आकारण्यात येणार आहे.

घनकचर्‍याचे खासगीकरण केले तर सहा ते सात कोटी रुपये पालिकेचे वाचणार असल्याचा सूर 28 फेब्रुवारीच्या बैठकीत सभागृहनेते राजू वैद्य, समीर राजूरकर यांनी आळवला होता. कचरा उचलण्याचा अंतिम अहवाल क्रिसील संस्थेने तयार केला आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार झाला असून तो 18 मार्च रोजी सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

प्रतिदिन शुल्क असे
रहिवासी मालमत्ता : बंगला 5 रुपये, फ्लॅट 2, झोपडपट्टीतील घरे 1, इतर वसाहतीमधील घरे 2 रुपये.
व्यावसायिक मालमत्ता : मोठे हॉटेल्स - 200 रुपये, मध्यम हॉटेल्स 100, लहान 25, सभागृह, चित्रपटगृह, लॉन्स 100, मॉल्स 500, आठवडी बाजार, भाजीपाला मार्केट 1 हजार रुपये, शासकीय-निमशासकीय, खासगी कार्यालये 10, शाळा-कॉलेजेस 15, फेरीवाले 1, दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब यांच्याकडून 15 रुपये अशा स्वरूपाचे शुल्क आकारण्यात येणार आहे.