आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गाळ’घोळ अंगलट: महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हर्सूल तलावातील गाळ काढण्याच्या निविदेतील अनियमितता निविदा काढता जादा दराने कोटी रुपयांचे रस्त्याचे काम मर्जीतील ठेकेदारांना देण्याच्या प्रकरणांत मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना निलंबित केले आहे.

पानझडे यांना गेल्या महिन्यात विविध प्रकरणांत आयुक्त बकोरिया यांनी नोटिसा दिल्या होत्या. रस्त्यांच्या कामांवरून पानझडे सर्वांच्याच निशाण्यावर असून त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई करण्यात आली नव्हती. आज आयुक्त बकोरिया यांनी हर्सूल तलावातील गाळ काढण्याच्या निविदेतील गैरप्रकार चक्क निविदाच काढता मर्जीतील ठेकेदारला तो कमी दरात काम करायला तयार असताना चक्क जादा दराने काम दिल्या प्रकरणात पानझडे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. दुपारी आयुक्तांनी पानझडे यांच्या निलंबनाच्या आदेशावर स्वाक्षरी केली.

मार्चपासून ‘दिव्य मराठी’ने हर्सूल तलावातील गाळ काढावा यासाठी पाठपुरावा केला होता. २०१४ मध्ये सरकारने मनपाला त्यासाठी कोटी रुपये दिले होते. पण ते पैसे इतरत्र वापरण्याचा प्रयत्न झाला, त्याला यश आले नाही. ‘दिव्य मराठी’ने वाचा फोडल्यावर विभागीय आयुक्त डाॅ. उमाकांत दांगट यांनी हा विषय हाती घेत गाळ काढण्याचे आदेश दिले. या कामाच्या निविदेतील अनेक घोळ पानझडेंच्या अंगाशी आले.
बातम्या आणखी आहेत...