आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातून पाच दुचाकींची चोरी, आरोपींना पकडण्यात पोलिसांना आले अपयश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातदुचाकी, मोबाइल चोरी, घरफोडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यास किंवा त्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे. शहरातून पाच दुचाकी चोरी गेल्याच्या तक्रारी विविध पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आल्या अाहेत.

हर्सूल येथील परमेश्वर सांगळे (२४) हे शेती व्यवसाय करतात. १२ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांनी टीव्हीएस स्टार सिटी (एमएच २० बीएस ९१५६) दुचाकी घरासमोर उभी केली होती. सकाळी घराबाहेर येऊन पहिले असता त्यांना दुचाकी आढळली नाही. याप्रकरणी सांगळे यांच्या तक्रारीवरून हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार सोन्ने हे करीत आहेत.

क्लासेस समोरून गाडी लंपास
एमआयडीसीवाळूज येथील हरी नाईकवाडे (३४) यांनी हीरोहोंडा कंपनीची दुचाकी (एमएच २० सीडब्ल्यू २८४४) नोव्हेंबर रोजी जयभवानी चौकातील एका क्लासेस येथे उभी केली असता अज्ञात चोराने ती लांबवली. याप्रकरणी १८ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात हरी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक बोडखे हे करीत आहेत.

क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा
सातारापरिसरातील पेशवेनगर येथील धनंजय कनकदंडे (४९) यांनी हीरोहोंडा कंपनीची दुचाकी (एमएच २० सीबी ७०२२) १७ नोव्हेंबर रोजी व्हिडिओकॉन ऑफिसच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. रात्री साडेआठच्या सुमारास तेथे आले असता गाडी चाेरी झाल्याचे लक्षात आले. धनंजय यांच्या फिर्यादीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार अभंग हे करीत आहेत. दरम्यान, चोरट्यांना पकडण्याची मागणी केली जात आहे.

भरदुपारी गाडी पळवली
सिडकोयेथील शैलेश चव्हाण (२३) याने त्याची हीरोहोंडा सीबीझेड दुचाकी (एमएच २० ओके ८४८०) १८ नोव्हेंबर रोजी दुपारी च्या सुमारास त्याच्या कोचिंग क्लाससमोर उभी केली असता चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी शैलेशच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके हे करीत आहेत.

सिडकोतील घटना
सिडकोयेथील शिवाजी जाधव (४४) यांनी त्यांची हीरोहोंडा स्प्लेंडर दुचाकी (एमएच २० बीव्ही ६१९६) १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास मनपाच्या वॉर्ड क्रमांक बी च्या पार्किंगमध्ये उभी केली असता अज्ञात चोराने ती लंपास केली. शिवाजी यांच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक चव्हाण हे करीत आहेत.