आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 44 Seats In BJP In Aurangabad Mayor Selection Process

AMC : सेनेला खिंडीत गाठण्याचा डाव, ४४+ चा भाजपचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापौर युतीचाच असेल यावर दोन्ही पक्षांचे एकमत असले तरी पहिला मान कोणाला, यावरून दोन्ही पक्षांत चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. भाजपने अपक्षांची मोट बांधत संख्याबळ ४४ पर्यंत पोहोचल्याचे सांगत पहिली संधी मिळण्याचा दावा केला, तर शिवसेनेने आपल्या जागा जास्त असल्याने महापौरपद सेनेकडेच राहील, असा दावा केला आहे. उद्या या हालचाली निर्णायक टप्प्यावर येतील असा अंदाज आहे.
११३ सदस्यांच्या मनपात बहुमताचा ५७ चा जादुई आकडा गाठण्यासाठी अपक्ष बंडखोरांना वळवण्यासाठी दोन्ही पक्ष कामाला लागले आहेत. शिवसेनेपेक्षा अधिक अपक्ष बंडखोर आपल्याकडे वळवण्यात भाजप ताकदीने उतरला आहे. शिवसेनेने हक्काच्या बंडखोर अपक्षांना आपल्या तंबूत आणले आहे. भाजपने रिपाइं(डे) चे २, अपक्ष तीन मुस्लिम नगरसेवक इतर १२ नगरसेवक आमच्याकडे आहेत, असा दावा भाजपने केला आहे.

भाजप-एमआयएम मैत्री?

शिवसेनेचा पर्यायी फाॅर्म्युला : शेवटच्या क्षणापर्यंत भाजपकडून नवनवीन प्रस्ताव येऊ शकतात हे ध्यानात घेत शिवसेनेने भाजपवर चाप ठेवण्यासाठी पाचपैकी एक वर्ष भाजपला महापौरपद उर्वरित चार आपल्याकडे हा प्रस्तावही तयार ठेवला आहे. मात्र, आपले संख्याबळ अधिक होत आहे हे लक्षात आल्यावरच तो रेटला जाईल.

अपक्षांच्या स्टार बैठका : दरम्यान,आजचा रविवार भाजपच्या मंडळींनी जास्तीत जास्त अपक्षांना ओढण्याच्या प्रयत्नांत घालवला. दुपारी अपक्ष नगरसेवकांना एका हाॅटेलात बोलावून घेतले. त्यांच्या ‘अपेक्षा' जाणून घेत सन्मानजनक आॅफर देण्यात येत होत्या. भाव चांगलाच वधारल्याने अपक्षांनीही तूर्तास भाजपच्या नेत्यांना स्पष्ट होकार कळवला नाही.

भाजपच्या नवनवीन चाली

शिवसेनेला बेजार करण्यासाठी भाजपने नवीन चाली खेळणे सुरू ठेवले आहे. पहिल्या अडीच वर्षांवर दावा करताना भाजपच्या काही नेत्यांनी राजू शिंदे यांना उतरवल्यास रिपाइंची दोन बसपाची पाच अशी सात मते निश्चित मिळतील महापौरपद सर्वसाधारण असताना दलित महापौर दिला असा संदेश जाईल, अशी भाजप नेत्यांची अपेक्षा आहे. समजा युतीचे फाटलेच तर हेच समीकरण आपल्याला तारेल, असा भाजप धुरिणांचा अंदाज आहे. त्यासाठी किशनचंद तनवाणी त्यांचे बंधू राजू तनवाणी यांची फिल्डिंग वापरली जाणार आहे.

राजू शिंदे यांना महापौरपदासाठी एमआयएम पाठिंबा देणार असल्याची चर्चा शहरात दिवसभर सुरू होती. या संदर्भात दोन्ही पक्षांनी काहीच भाष्य केले नसले तरी शिंदे यांच्या रूपाने दलित महापौर होण्यासाठी एमआयएम पाठिंबा द्यायला तयार असल्याची चर्चा होती.