आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाकाऊ अन्न नाल्यांमध्ये, डुकरांचे झाले आगार, कारवाईचा दुष्काळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगपुरा येथील नाल्यात हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधून आणलेले अन्न असे टाकले जाते. - Divya Marathi
औरंगपुरा येथील नाल्यात हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधून आणलेले अन्न असे टाकले जाते.
औरंगाबाद - शहरातील बहुतांश भागांत नाल्यांमध्ये डुकरांचे अड्डेच निर्माण करण्यात आले आहेत. हॉटेलमधील उरलेले अन्न नाल्यांमध्ये सर्रास आणून टाकले जाते. त्या माध्यमातूनच डुकरांचे पालन केले जात आहे. पण यामुळे दुर्गंधी, साथीचे रोग आणि एकूणच सामाजिक प्रश्नांबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तक्रार केली तर वराहपालक धमक्या देतात. मनपा कारवाईचा फक्त दिखावा करते आणि त्या त्या भागातील राजकीय पुढारी याकडे सोइस्करपणे दुर्लक्ष करतात.अन्न विल्हेवाटीचा खर्च वाचतो म्हणून हॉटेलचालक तर, डुकरांसाठी अन्न मिळते म्हणून वराहपालक हा सगळा ‘उद्योग’ करतात.

भर वस्तीत नाल्यांमध्ये डुकरांसाठी अन्न टाकले जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानंतर चमूने शहरात सर्वत्र पाहणी केली. तेव्हा नाथ सुपर मार्केट, दलालवाडी, गांधीनगर, खडकेश्वर, औरंगपुरा, नागेश्वरवाडी, चेलीपुरा, मयूर पार्क, बेगमपुरा, हर्षनगर, औरंगाबाद टाइम्स कॉलनी, सिडको एन-६, भीमनगर, भावसिंगपुरा, मुकुंदवाडी, शहानूरमियाँ दर्गा, गारखेडा, उस्मानपुरा, रेल्वेस्टेशन, पडेगाव, मिटमिटा, छावणी, टीव्ही सेंटर या सर्व परिसरातील नाल्यांमध्ये डुकरांचे अड्डे असल्याचे उघड झाले.

दुर्गंधीबरोबरच रोगराईही : हे वराहपालक आपापल्या भागातील नाल्यात हॉटेल-रेस्टॉरंटचे उरलेले अन्न रात्री आणून टाकतात. ठरलेल्या वेळी रोज हे अन्न मिळत असल्याने या डुकरांच्या झुंडी नाल्यांत बसलेल्या दिसतात. त्यामुळे अन्न व त्यांच्या मलमूत्राची दुर्गंधी सुटते. सोबतच सर्वत्र भरवस्तीत रोगराई पसरते. बहुतांश नाले भर वस्तीतून वाहत असल्याने त्या त्या परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा व साथीच्या आजारांचा त्रास सहन करावा लागतो.

वसाहतींमध्ये असुरक्षितता : डुकरांचा कायम वावर असल्याने त्या त्या भागात लोक भीतीनेच वावरतात. रात्रीच नव्हे, तर दिवसाही डुकरांचा कळप वसाहतींमध्ये फिरतो. औरंगपुऱ्यात अनेकांना डुकरांनी चावे घेतल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

नाल्याच्या भिंतींची ताेडफोड : विविध हॉटेल्समधील अन्न प्लास्टिक कॅन्समध्ये भरून ते नाल्यात आणून टाकले जातात. या कॅन्स त्या त्या ठिकाणी नाल्यांच्या संरक्षक भिंती फोडून टाकल्या जातात. या भिंती फोडल्यामुळे नाल्यात वाहने वा लहान मुले पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मनपाचा नोटिसांचा सोपस्कार : उपरोक्त त्रासाबाबत नागरिक मनपात लेखी तक्रारींचा पाऊस पाडतात. जागेचा वापर उपद्रवकारक पद्धतीने करणाऱ्या वराहमालकांना हे वराहांचे अड्डे गावाबाहेर हलवण्याच्या नोटिसा देत त्यांची एक तक्रार संबंधित क्षेत्रीय पोलिस ठाण्यात देऊन कागदी कारवाई पार पाडतात. पण कृतिशील कारवाईत मनपा सोइस्कर दुर्लक्ष करते. तर, पोलिसही जबाबदारी झटकतात.

आजवर यांना बजावल्या नोटिसा : प्रीतम अडवाल, राजकुमार ईश्वरसिंग भागडा, भय्यू दुलारी, निखिल भारती, सुनील चावरिया, सुनील मकळे, लक्ष्मण बकुळे, बाळू गायकवाड, रवी गायकवाड, जयकिशन सौदे, दिनेश लाहोट, अनिल कागडा, संतोष कागडा, सुनील लाहोट, प्रदीप आठवाल, राजेंद्र चव्हाण, योगेश लाहोट, अमित रिडलॉन, रविंद्र आठवाल, रामा भागडा, जाेगींदर डूगलय, पप्पू आठवाल, रविंद्र नामधारी,जगविर लाहोट, यांना विनापरवाना डूकरे पाळून शहरात विविध भागातील लोकांना त्रस्त करतात. त्यामुळे असह्य दुर्गधीचा आणि डासांचा त्रास होऊन शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आल्याचे मनपाच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या, मात्र कारवाई झाली नाही.
पुढील स्लाइडमध्ये, शहरातील विविध भागांतील अड्डे आणि काय आहे नियम
बातम्या आणखी आहेत...