आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad City Slum Dwellers Will Get Flats, Beneficiaries 3.5 Lakh

औरंगाबाद शहरातील झोपडपट्टीवासीयांना फ्लॅट मिळणार, 3.5 लाख लोकांना लाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(संग्रहित छायाचित्र.)
औरंगाबाद - मुंबईत राबवल्या जाणा-या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (एसआरए) धर्तीवर औरंगाबादेतील ५२ झोपडपट्ट्यांतील लोकांना फ्लॅट देण्याची घोषणा पालकमंत्री रामदास कदम यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही योजना राबवणार असल्याचे कदम यांनी शुक्रवारी सांगितले. यात अनेक सुविधा राबवण्यात येणार आहेत.
मनपाच्या तसेच गायरान जमिनींवरील ५२ झोपडपट्ट्यांत योजना राबवली जाईल. साधारण ३.५ लाख लोक या झोपडपट्ट्यांत राहतात. त्यांना मोफत फ्लॅट उपलब्ध करून दिले जातील. याबाबत २० रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून प्रक्रिया राबवण्यात येईल. विकासकांच्या माध्यमातून ही घरे बांधली जातील. या मोक्याच्या जागेवर बिल्डरांना अडीच एफएसआय दिला जाईल. यावर विभागीय आयुक्त व जिल्हाधिका-यांची बैठकही घेतल्याचे कदम यांनी सांगितले. गुंठेवारीचा प्रश्न सोडवण्यासाठी कायदा करणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

पुढे वाचा, शहराच्या सौंदर्यात भर